Download App

गटतट विसरून विकासगंगा आणण्यासाठी साथ द्या, शिवाजीराव कर्डिलेंची मतदारांना साद…

गटतट विसरून विकासगंगा आणण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

  • Written By: Last Updated:

नगर : माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच नगर तालुक्यातील माझ्या जनतेच्या पाठबळावर झाली. तीस वर्षांपासून तालुक्यातील सर्वस्तरातील जनता माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे. मी कधीही जात-पात-धर्म न पाहता गावागावांत विकासकामे केली. पाणी योजना सुरु करून पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवले. आताही गटतट विसरून विकासगंगा आणण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी केले.

मी एकटीच बहीण नव्हे तर लाखापेक्षा अधिक बहिणीचा आशीर्वाद माझ्या भावाच्या पाठीशी; प्राजक्ताताई मारवा निलंगेकर 

शिवाजीराव कर्डिले यांनी नगर तालुक्यातील दरेवाडी, वडारवाडी, केकती, बारा बाभळी आदी गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच त्यांनी नेप्ती कांदा मार्केट मधील हमाल, मापाडी, व्यापारी शेतकऱ्यांची संवाद साधत भाजपला साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, माजी नगरसेवक निखिल वारे, अनिल करंडे, कानिफनाथ कासार, विजय खोमणे, ज्ञानदेव काळे, रामपाल मळकर, लक्ष्मण तागड, संजय धोत्रे, अंबादास बेरड, सोनू भुजबळ, बद्रीनाथ बेरड, रामदास आंधळे, गोविंद सांगळे, बापू लाटे, अनिल म्हेत्रे, रावसाहेब वागस्कर, प्रकाश घोरपडे, सुभाष गुंजाळ, माणिक वागस्कर, बाळासाहेब तागडकर आदी उपस्थित होते.

काकांनी डोळे वटारल्याने अर्ध्या तासात लग्न मोडलं, राज ठाकरेंचा शरद पवार-अजित पवारांवर हल्लाबोल 

सहा खाते मिळूनही प्रश्न मार्गी लावले नाही...
यावेळी कर्डिले म्हणाले, मागील निवडणुकीत माझा पराभव झाला. पण ज्यांना मामाच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले, सहा खाते मिळाले त्यांना विकासाचे प्रश्न मार्गी लावता आले नाही. मी आमदार नसतानाही राज्यातील भाजप महायुतीचे सरकार, पालकमंत्री, खासदार यांच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावली. त्याचे श्रेय घेवून नारळ फोडण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधीनी चालवले आहे. ही धूळफेक जनतेला कळून चुकली आहे. मी तुमच्या हक्काचा माणूस आहे. गटतट विसरून विकासगंगा आणण्यासाठी साथ द्यावी, असे त्यांनी केलं.

तनपुरेंकडून श्रेय घेण्याचे काम…
कर्डिले म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती दलित वस्ती निधी अंतर्गत होणाऱ्या कामाचे श्रेय घेण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधीने चालवले आहे. त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून गावांना विविध खात्याअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात पूर्ण अपयश आले. वडारवाडी येथील हनुमानाचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून याठिकाणी भव्य अशी कमान उभी राहणार आहे. या कामासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

नेप्ती उपबाजार समितीत बोलताना कर्डिले म्हणाले, नेप्ती उपबाजार समितीतील कांदा मार्केट देशात अग्रेसर आहे. याठिकाणी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात येतात. कारण माझी शेतकऱ्यांशी बांधलकी आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल पूर्ण माफ केले आहे. शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये भेटतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरा साथदार महायुतीच आहे. नेप्ती उपबाजार समितीमध्ये दोनशे व्यापारी आपल्या कांद्याचा व्यवसाय करत असून 2 हजार हमाल मापाडी रोजगार मिळवतात. येथील शेतकरी, हमाल, व्यापारी यांच्या व्यथा आम्हाला माहीत आहेत. त्यांच्या संकट, अडीअडचणींच्या काळामध्ये आम्हीच धावून जात असतो. ग्रामसेवकापासून थेट मंत्र्यांपर्यंत फोन लावून जनतेचे प्रश्न मार्गी लावून घेत असतो. हीच परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे.

व्यापारी, हमाल मापाडी यांचा कर्डिलें आणि जगतापांना पाठिंबा
नेप्ती उपबाजार समितीत झालेल्या बैठकीत हमाल, मापाडी, व्यापाऱ्यांनी एकमुखाने शिवाजीराव कर्डिले आणि आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. अविनाश घुले म्हणाले, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले नेहमीच सर्वसामान्य जनतेला डोळ्या समोर ठेवून काम करत असतात. नेप्ती उपबाजार समितीची निर्मिती केल्यामुळै सुमारे 2 हजार हमाल मापाडींना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा आम्ही देत आहोत.

follow us