काकांनी डोळे वटारल्याने अर्ध्या तासात लग्न मोडलं, राज ठाकरेंचा शरद पवार-अजित पवारांवर हल्लाबोल

  • Written By: Published:
काकांनी डोळे वटारल्याने अर्ध्या तासात लग्न मोडलं, राज ठाकरेंचा शरद पवार-अजित पवारांवर हल्लाबोल

Raj Thackeray : यंदा विधानसभेला महाविकास आघाड (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुतीचा (Mahayuti) सामना रंगणार आहे. मनसेनेही त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. आज कसब्यातील सभेत बोलतांना राज ठाकरेंनी महायुती आणि महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला.

संविधान सन्मान सभा: संभाजीराव निलंगेकरांसाठी मंत्री आठवले मैदानात ! 

काकांनी डोळे वटारल्याने अर्ध्या तासात लग्न मोडलं…
कसबा पेठ मतदारसंघातील मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी कसब्यात सभा घेतली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, 2019 ला भाजप आणि शिवसेना एकत्र लढली. भाजप-सेनेकडे सगळं बहुमत होतं. मग एक सकाळचा शपथविधी झाला. मात्र, काकांनी डोळे वटारल्याने अर्ध्या तासात लग्न मोडलं, अशा शब्दात त्यांनी शरद पवार – अजित पवारांवर टीका केली.

फडणवीसांनी घेतली मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांची भेट, नेमकं कारण काय? 

पुढं ते म्हणाले, ज्याच्या विरोधात शिवसेनेनं निवडणूक लढवली. त्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरे गेले. माझ्या गळ्यात हार घाला, मुला मुख्यमंत्री करा, अरे केवढी ही लाचारी, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंचाही समाचार घेतला.

पक्षाचे 40 आमदार सोडून निघून जातात आणि पक्षाला पत्ताच नाही. शिवसेना फोडल्यानंतर शिंदे म्हणाले, अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. नंतर एका वर्षानं काय झालं? तेच अजित पवार मांडीवर येऊन बसले. 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केलेल्या माणसाला आम्ही तुरुंगात टाकू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यानंतर दहाच दिवसात अजित पवार मंत्रीमंडळात गेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, राज्यात फक्त सावळा गोंधळ सुरू आहे, असं म्हणत त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर टीका केली.

नगरसेवक असतो हेही लोक विसरले….
राज्यात गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यावरून राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली. चार-पाच वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका झाल्याच नाही. नगरसेवक असतो हेही लोक विसरून गेले. कसब्याची परिस्थिती खराब झालीय. छोट्या गल्ल्या, त्याला आकार नाही, उतार नाही. केवळ मेट्रो येऊन किंवा प्लायओव्हर बांधून शहरं सुधरत नाहीत, असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube