सुवर्णा कोतकरांची माघार, महाविकास आघाडीत बंडखोरी; जगताप, कळमकर, गाडे यांच्यात लढत
Ahmednagar City Assembly constituency:अर्ज माघारीच्या दिवशी ननगर शहर मतदारसंघाचे (Ahmednagar City Assembly constituenccy) आज चित्र क्लिअर झाले आहे. या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. अजित पवार गटाकडून संग्राम जगताप (Sangram Jagtap), शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर (Abhisek Kalamkar), ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होईल. नगर मतदारसंघातून चौदा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.
Vidhansabha Election : ‘बाळा भेगडे हे पलटू मामा…; सुनील शेकळेंचा हल्लाबोल
महाविकास आघाडीचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी उपमहापौर सुर्वणा कोतकर यांनीही माघार घेतली आहे. आता महायुतीचे आमदार संग्राम जगताप आणि महाविकास आघाडीचे माजी महापौर अभिषेक कळमकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अपक्ष उमेदवार शशिकांत गाडे यांच्यात लढत होणार आहे. 24 पैकी 10 जणांनी माघार घेतल्याने 14 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
…अर्ज मागे घ्या, अन्यथा कारवाई करणार; उद्धव ठाकरे गटाचा बंडखोरांना कडक इशारा
नगर शहरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट राजकीय सामना रंगणार असे चित्र असताना अपक्ष म्हणून शशिकांत गाडे यांनी आपला अर्ज कायम ठेवला असल्याने नगर शहरात आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान नगर शहरात अत्यंत चर्चेचा विषय ठरलेल्या कोतकर यांची भूमिका देखील स्पष्ट झाली आहे. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी देखील अर्ज मागे घेतला आहे. नगरच्या मैदानात उतरणार असल्याचा निर्धार कोतकर कुटुंबाचा होता. तशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती. परंतु आता कोतकर यांनी माघार घेतली आहे.
नगरची जागा ठाकरे गटाला हवी होती
नगरची जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला मिळावी, अशी मागणी शिवसैनिकांची होती. त्यामुळे फुलसौंदर, बोराटे, गाडे यांनी तिघांनी अर्ज भरला होता. त्यात शिवसैनिकांनी एकत्र येत गाडे यांचा अर्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.