Download App

विनोद तावडे प्रकरण, किती रोखड जप्त अन् काय कारवाई होणार? पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुलेंनी सगळं काही सांगितलं

Vinod Tawde : आज सकाळी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये (Vivanta Hotel) बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते विनोद तावडे

  • Written By: Last Updated:

Vinod Tawde : आज सकाळी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये (Vivanta Hotel) बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत हॉटेलमध्ये गोंधळ घातला. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमणात व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हॉटेल सिल केले आहे. तर या प्रकरणात काय कारवाई करण्यात आली आणि किती रक्कम जप्त करण्यात आली आहे तसेच पुढे काय कारवाई होणार याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

या प्रकरणात पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले (Pournima Chougule) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना पौर्णिमा चौगुले म्हणाल्या की, या घटनेबाबत 12.30 सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. माहिती मिळतातच पोलीस घटनस्थळी दाखल झाली. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर भाजपा आणि बविआचे लोक होते.जेव्हा आम्ही रूम चेक केला तेव्हा आम्हाला काही पैसे आणि डायरी सापडल्या. त्यानंतर या प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर तिसरी एफआयआर आम्ही दाखल करण्याची तयारी करत आहोत.

रूममध्ये जे पैसे आणि डायरी मिळाली आहे. ती आम्ही जप्त करून पुढील तपास सुरु केला आहे. अशी माहिती माध्यमांशी बोलताना पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी दिली.

तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी मोठा खुलासा करत विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी येणार असल्याची माहिती भाजप नेतेकडून देण्यात आली असल्याचा दावा केला. माध्यमांशी बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, मला भाजप नेत्याकडून सांगण्यात आले की विनोद तावडे 5 कोटी घेऊन वाटप करण्यासाठी आले आहे. मात्र मला यावर विश्वास नव्हता पण दुर्देवाने ते खरं ठरलं.

आज हॉटेलमध्ये पैसे आणि डायरी पकडली गेली. त्या डायरीमध्ये नाव आणि नावांसमोर किती हजार दिले अशी नोंद आहे. सकाळी अनेकांना पैसे वाटप झाले असावे आणि त्यांच्याकडे 19 लाख रुपये सापडले अशी माहिती आहे. असं माध्यमांशी बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले.

मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना संधी

राज्यात विधानसभेसाठी उद्या 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. राज्यात यावेळी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

follow us