विनोद तावडेंना निवडणूक आयोगाचा दणका! राजन नाईकांवरही गुन्हा दाखल…
Vinod Tawde : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडेंनी (Vinod Tawde) मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप झाला. बहुजन आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी हा आरोप केला. त्यामुळं हे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. याप्रकरणी निवडणूक आयोगाने (Election Commission) त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या अडचणीत वाढ झाली.
व्लादिमीर पुतिन यांची मोठी घोषणा, बॅलेस्टिक मिसाइल डागले तर होणार अण्वस्त्र हल्ला, जगात खळबळ
आचारसंहिता लागू असताना पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी विनोद तावडे आणि भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विरार येथील तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय प्रकरण आहे?
मतदानाला अवघा एक दिवस उरला असतांना गेल्या चार तासांपासून विरारमधील एका हॉटेलमध्ये प्रचंड राडा सुरू होता. विनोद तावडे हे हॉटेल विवांतमध्ये पैसे वाटत असल्याचा प्रकार बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकून समोर आणला. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तावडेंना घेराव घातला आणि जाब विचारण्यास सुरुवात झाली. बहुजन आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंवर 15 कोटी रुपये वाटल्याचा आरोप केला असून, याची नोंद असलेली डायरी यावेळी सापडल्याचा दावाही करण्यात आला आहे.
तावडेंना भाजप नेत्यांनीच पकडून दिलं, त्यांच्यावर गृहखात्याकडून पाळत; संजय राऊतांचा गंभीर आरोप…
तावडेंची बाजू काय?
तर विनोद तावडेंनी माध्यमांशी बोलताना पैसे वाटल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याविरोधात हे षडयंत्र रचण्यात आल्याचे तावडे म्हणाले. निवडणूक आयोगाने याची निःपक्षपातीपणे चौकशी करावी. मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. मी काहीही चुकीचे केले नाही. हे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे षडयंत्र आहे, असं तावडे म्हणाले.
हितेंद्र ठाकूर यांचा मोठा गौप्यस्फोट
विनोद तावडे यांच्यावरील आरोपांच्या मुद्द्यावर बोलताना बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. विनोद तावडे हे पैसे वाटणार असल्याची माहिती त्यांना भाजपच्या एका नेत्याकडून मिळाल्याचं विधान त्यांनी केलं.