Ram Mandir : सध्या संपूर्ण देशात प्रभू श्रीरामांच्या ( Ram Mandir) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. अवघ्या काही वेळात अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण देशात राममय वातावरण झालं आहे. सर्वांच्या ओठांवर रामस्तुतीचे गाणे ऐकायला मिळत आहे. यामध्येच ‘राम आयेंगे‘ (Ram ayenge) हे गाणे सध्या खूप ट्रेंड होतं आहे. विशेष म्हणजे दिवंगत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न एआयने केला आहे.
Lata Mangeshkar: AI ने लता मंगेशकर यांच्या आवाजात गायलं ‘राम आयेंगे’, Video Viral
‘राम आयेंगे’ हे गाणे मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यावेळी आवाज प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचा आहे. होय हे खरे आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे भजन सोशल मीडियावर लोकप्रिय झाले असून लोकांना ते खूप आवडले आहे.
मोदींनी कधीच श्रीरामांच्या तत्वांचं आचरण केलं नाही; भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर
लता मंगेशकर यांचे एक-दिड वर्षापूर्वी निधन झालं. परंतु, आजही त्यांच्या आवाजाची क्रेझ कमी झाली नाही. त्यांची सदाबहार गाणी लोक आवडीने ऐकतात. सध्या लता दीदींच्या आवाजातील एक ऑडिओ-व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लता मंगेशकर यांनी गायलेले ‘राम आयेंगे’ हे गाणे AI च्या माध्यमातून रिक्रिएट करण्यात आले आहे. अयोध्येतील भगवान श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अनेक कलाकार गाणी लिहित आणि गात आहेत. यामध्येच ‘राम आयेंगे’ हे गाणे सध्या खूप ट्रेंड होतंय. लता दीदींच्या आवाजतल्या या गाण्याला अनेकांनी पसंती दिली आहे.
The most appropriate use of AI so far… pic.twitter.com/ClkDSF9e6u
— Ranvijay Singh (@ranvijayT90) January 20, 2024
‘राम आयेंगे…’ हे मूळ गाणे प्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रा यांनी गायले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या गाण्याचे कौतुक केले. आता एका एआय यूजरने लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं यूट्यूबवर रिलीज केलं. एआय आणि साउंड इंजिनीअरिंगच्या मदतीने त्याने हा ऑडिओ तयार केल्याचे सांगितल्या जातं. संबंधित गायक आणि संगीतकारांचा आदर ठेवूनच ही कृती करण्यात ल्याचं एआय युजरने सांगितलं. महत्वाचं म्हणजे, हा ऑडिओ कोणत्याही आर्थिक फायद्यासाठी बनवला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे गाणं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मोठ्या प्रमाणात शेअर केलं जातं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा एक चांगला प्रयत्न आहे, असं एकाने लिहिले. तर दुसर्याने लिहिले, हा इतका गोड आवाज आहे की मी तासनतास ऐकू शकतो, अशा प्रतिक्रिया या गाण्यावर येत आहेत.