Letsupp मराठीच्या वृत्ताची ठाकरेंकडून दखल : कारसेवक संतोष मोरेंना गोदा किनारी ‘खास सन्मान’

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (ShivSena) यांनी लेट्सअप मराठीच्या वृत्ताची दखल घेत अयोध्येमध्ये कार सेवा केलेल्या संतोष मोरे (Santosh More) यांचा ‘खास सन्मान’ केला आहे. मोरे यांच्या ठाकरेंप्रतिच्या निष्ठेचा आणि त्यांच्या कारसेवेचा सन्मान करत ठाकरे यांनी त्यांना उद्या नाशिकच्या गोदावरी नदीच्या किनारी पार पडणाऱ्या महाआरतीचा ‘मान’ देऊ केला आहे. नुकताच लेट्सअप मराठीने मोरे यांच्या […]

Santosh More

Santosh More

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (ShivSena) यांनी लेट्सअप मराठीच्या वृत्ताची दखल घेत अयोध्येमध्ये कार सेवा केलेल्या संतोष मोरे (Santosh More) यांचा ‘खास सन्मान’ केला आहे. मोरे यांच्या ठाकरेंप्रतिच्या निष्ठेचा आणि त्यांच्या कारसेवेचा सन्मान करत ठाकरे यांनी त्यांना उद्या नाशिकच्या गोदावरी नदीच्या किनारी पार पडणाऱ्या महाआरतीचा ‘मान’ देऊ केला आहे. नुकताच लेट्सअप मराठीने मोरे यांच्या अनुभवावर एक खास वृत्त केले होते. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) will give ‘specially honoured’ to Santosh More, who served the karseva in Ayodhya)

सध्या लोअर परळ येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपशाखाप्रमुख असलेले संतोष मोरे सध्या 57 वर्षांचे आहेत. ते 25 वर्षांचे असताना अयोध्येला गेले होते. त्यांचा अनुभव सांगताना ते म्हणाले होते,“आम्ही सेनेच्या अनेक नेते, आमदार आणि नगरसेवकांसह कारसेवेसाठी अयोध्येला गेलो होतो. बाळासाहेबांनीच आम्हाला पाठवले. आम्ही जीव धोक्यात घालून तिथे गेलो होतो. पण आज राम मंदिराचा उद्घाटन आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होत असताना उद्धव ठाकरेंना योग्य श्रेय, सन्मान दिलेला नाही.

Ayodhya : 10 मंत्रोच्चार, 10 वेळा स्नान अन् 10 दान… अशी आहे PM मोदींची दिनचर्या

शनिवारी सायंकाळपर्यंत निमंत्रण पाठविले नव्हते. नंतर स्पीडपोस्टद्वारे निमंत्रण पाठवले, जे अजिबात योग्य नाही. योग्य आदर द्यायला हवा होता. रामजन्मभूमी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ठाकरे आणि शिवसैनिकांकडे ते कसे दुर्लक्ष करू शकतात? असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता मोरे यांच्या या कारसेवेचा आणि ठाकरेंप्रतिच्या निष्ठेचा निष्ठेचा सन्मान करत ठाकरे यांनी त्यांना गोदा किनारी पार पडलेल्या महाआरतीचा मान देऊ केला आहे.

उद्या शिवसेना (उबाठा) नाशिकमध्ये करणार महाआरती :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 22 आणि 23 जानेवारीला नाशिकला राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. प्रत्यक्ष अधिवेशन 23 तारीखला सुरू होणार आहे. पण त्यापूर्वी अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काळाराम मंदिरामध्ये दर्शन, पूजा त्यानंतर गोदावरीवर महाआरती असा 22 तारीखेला कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील. त्यानंतर गोदावरी तीरावर आगमन होईल आणि महाआरती होईल. याआधी उद्धव ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानी किंवा स्मारकाला तिथे भेटही देणार आहेत.

Exit mobile version