Ayodhya : 10 मंत्रोच्चार, 10 वेळा स्नान अन् 10 दान… अशी आहे PM मोदींची दिनचर्या

Ayodhya : 10 मंत्रोच्चार, 10 वेळा स्नान अन् 10 दान… अशी आहे PM मोदींची दिनचर्या

अयोध्या : उद्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते तर राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) आणि मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Satyendra Das) यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेमकी दिनचर्या कशी असणार, पुजा कशी सुरु होणार याबाबतची माहिती समोर आली आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गुरुदेव गिरीजी महाराज यांनी माध्यमांसी संवाद साधताना याबाबतची सविस्तर माहिती दिली. (What will be the exact routine of Prime Minister Narendra Modi on the inauguration day of Shri Ram Mandir)

1992 चे वर्ष, रेल्वे स्टेशन अन् कारसेवकांची गर्दी : फडणवीस यांचा अयोध्या आंदोलनातील फोटो सापडला

स्वामी गुरुदेव गिरीजी महाराज म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिरात पोहोचल्यावर पंतप्रधान प्रथम स्नानासाठी जातील. त्यानंतर पंतप्रधान मोदी आधी उत्तरेच्या दरवाजाकडे जातील आणि नंतर जिथे मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार आहे त्या पूर्वेकडील दरवाजाने प्रवेश करतील. मंदिरात प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान प्रथम विश्वस्तांना भेटतील. याशिवाय आम्ही समाजातील विविध व्हीआयपींनाही बोलावले आहे.”

रामलल्ला प्राण प्रतिष्ठा : मंत्रांद्वारे 10 विविध प्रकारचे स्नान

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणाले, “मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंत्रोच्चाराच्या माध्यमातून 10 विविध प्रकारचे स्नान करावे लागते. मंत्रांच्या माध्यमातून 10 वेळा पाणी शिंपडले जाईल. त्यानंतर पंतप्रधान 10 प्रकारचे दान करतील. यानंतर पंतप्रधान मोदी गर्भगृहात प्रवेश करतील. तिथे दुपारी सुमारे 12:20 वाजता पूजा सुरू होईल आणि सुमारे 50 मिनिटे चालेल, असेही त्यांनी सांगितले.

‘यूपी’ला ‘राम’ पावणार! दरवर्षी सरकारी तिजोरीत येणार 25 हजार कोटी?

11 दिवसांचे अनुष्ठानही संपणार :

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेआधी एका ऑडिओ संदेशात पंतप्रधान मोदी यांनी आपण अकरा दिवसांचे अनुष्ठान सुरू केल्याचे सांगितले होते. या अनुष्ठानाचे नियम अत्यंत कठोर आहेत. जमिनीवर झोपणे, आहारात फक्त नारळ पाणी घेणे, गोपूजा आणि दान करणे अशा काही नियमांचा समावेश आहे. दिवसभराच्या अतिशय व्यस्त वेळापत्रकातही या नियमांचे मोदी यांनी तितक्याच कठोरपणाने पालन केले आहे. हे अनुष्ठान उद्या संपणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज