12TH Fail Movie Trailer : मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांपुढे एक अनोखं स्थान निर्माण करणाऱ्या विक्रांत मेस्सीचे नाव जोरदार चर्चेत आहे. त्यानं हसीन दिलरुबामध्ये साकारलेली भूमिका आणि मिर्झापूर या सिरीयलमधील गुड्डू भैय्याचा लहान भावाची मुख्य भूमिका चाहत्यांच्या खूपच आवडल्याचे बघायला मिळाले होते. तसेच आता त्याच्या नव्या सिनेमाची जोरदार चर्चा रंगत आहे.
विक्रांत मेस्सीचा ‘१२ फेल’ नावाचा सिनेमा ऑक्टोबरच्या २७ तारखे दिवशी चाहत्यांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याला चाहत्यांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा बघायला मिळत आहे. तसेच काहीही झालं तरी युपीएससी पास होऊन मोठा अधिकारी व्हायचचं असं स्वप्न त्याच्या मनामध्ये आहे. त्यासाठी तो जीवघेण्या संघर्षाला सामोरा जात असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याला वाटेत जी संकटं येत आहेत, त्यावर तो नेमकं कोणत्या पद्धतीने मात करणार आहे, हे सांगणारा सिनेमा म्हणून १२ वी फेलकडे बघता येणार आहे.
तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाची अनेक दिवसांपासून चाहते, विक्रांतची खूप आतुरतेने वाट बघत आहेत. तसेच याअगोदर ओटीटीवर युपीएसएसीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या अनेक सीरिज देखील प्रदर्शित करण्यात आल्या आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास द अॅस्पिरंट या सिरीयलचे नाव घ्यावे लागणार आहे. सध्या युवावर्गाची त्याला मोठी पसंती मिळत असल्याचे बघायला मिळत आहे. ’12TH Fail’ मध्ये विक्रांतनं युपीएससी एका विद्यार्थ्यांची मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाला आणि त्यानं संवादावर आता चाहते चांगलेच खूश होत आहे.
Fighter: हृतिक अन् सिद्धार्थचा ‘फायटर’ ची एक खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला
एका खेडेगावामध्ये राहणारा तो त्याला युपीएससीमधून मोठा अधिकारी होण्याची स्वप्नं कसे पडू शकतात. त्याला त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी नेमका कोणत्या प्रकारचा संघर्षाला सामोरं जावं लागतं, हे त्या सिनेमातून सांगण्याचा प्रयत्न विधू विनोद यांनी केल्याचे बघायला मिळाले आहे. विक्रांतनं स्वताला या सिनेमासाठी खूपच उत्तमरित्या साकारले आहे. त्याचा फिजिकल फिटनेस एकदम हटक्या अंदाजात दिसत आहे. त्याचे दिसणे देखील चाहत्यांना कमालीचे भावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12TH Fail हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे, आणि त्यामधून हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी यावेळी केला आहे. विधू विनोद चोप्रा यांचा हा सिनेमा २७ ऑक्टोबर दिवशी हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे.