Fighter: हृतिक अन् सिद्धार्थचा ‘फायटर’ ची एक खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Fighter: हृतिक अन् सिद्धार्थचा ‘फायटर’ ची एक खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Fighter: सुपर डायरेक्टर सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या तयारीत असताना दोघांची त्यांच्या नवीन सिनेमॅटिक (Cinematic) प्रवासाला सुरुवात करत केली आहे. सध्या ‘फायटर’ (Fighter Movie) ची टीम इटलीमध्ये दोन डान्स शूट करत असून याची एक खास झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Anand (@s1danand)


या दोघांचा मागील ब्लॉकबस्टर “बँग बँग” आणि “वॉर” या दोन्ही चित्रपटांची अनिवर्सरी सेलिब्रेट करत असताना (Instagram Post ) आता हे दोघं फायटरसाठी पुन्हा एकदा एकत्र काम करत असल्याचे बघायला मिळणार आहे. हे दोन्ही चित्रपट 2 ऑक्टोबर 2014 आणि 2019 रोजी रिलीज झाले होते, आणि त्यांच्या सिनेमाच्या वर्धापन दिनानिमित्त या दोघांनी फायटरच्या सेटवरील एक खास फोटो शेअर केला आहे.

हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये अप्रतिम कथा आणि दूर दृष्टी असलेला दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थ आनंद “फायटर” मधून पुन्हा एकदा बाजी मारण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. तसेच हृदयस्पर्शी आणि थरारक व्हिडिओने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आकर्षक कथा असलेला “फायटर” हा एक हाय- ऑक्टेन अॅक्शन-पॅक असणार आहे यात काही शंका नाही.

तसेच ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर सिद्धार्थ आनंद आणि हृतिक रोशन पुन्हा एकदा सिनेमॅटिक एक अनोखा इतिहास रचण्यासाठी सज्ज होताना बघायला मिळणार आहेत. दरम्यान ‘फायटर’ या सिनेमाची घोषणा १० जानेवारी २०२१ दिवशी करण्यात आली होती. त्यानंतर या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात करण्यात आली. या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे दोघेही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्याबरोबरच या चित्रपटात अनिल कपूरही झळकणार आहे.

Vivek Oberoi: प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉयला दीड कोटींचा गंडा, काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहिती नुसार, फायटरमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर आणि तलत अजीज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. फायटरमध्ये हवाई कारवाई पूर्ण होणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. हा सिनेमा २५ जानेवारी २०२४ दिवशी प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube