Akhil Mishra Passed Away: 3 इडियट्स फेम अभिनेत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

Akhil Mishra Death: मनोरंजन क्षेत्रातील अभिनेता आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘थ्री इडियट्स’मधील लायब्रेरियन दुबेची भूमिका करणारा अभिनेता अखिल मिश्रा (Akhil Mishra Passed Away) यांचा इमारतीवरून पडून धक्कादायक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अखिल मिश्रा हे ५८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अखिल मिश्राच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने […]

Akhil Mishra Death

Akhil Mishra Death

Akhil Mishra Death: मनोरंजन क्षेत्रातील अभिनेता आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘थ्री इडियट्स’मधील लायब्रेरियन दुबेची भूमिका करणारा अभिनेता अखिल मिश्रा (Akhil Mishra Passed Away) यांचा इमारतीवरून पडून धक्कादायक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अखिल मिश्रा हे ५८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अखिल मिश्राच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने मनोरंजनसृष्टीत मोठी खळबळ उडाली असून चाहत्यांना या बातमीवर विश्वास बसत नसल्यचे बघायला मिळत आहे. अखिल मिश्रा यांच्या पश्चात त्याची पत्नी सुझान बर्नर्ट आहे. सुझान बर्नर्ट ही जर्मन अभिनेत्री आहे. अखिलने अखेरचा श्वास घेतला तेव्हा ती हैदराबादमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळेस तिने ‘माझे हृदय तुटले आहे, माझा जीवनसाथी गेला आहे.’, अशी प्रतिक्रिया सुझानने यावेळी दिली आहे.


नेमकं काय घडलं?

अखिल मिश्रा हे हैदराबादमध्ये एका प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये होते. त्या शूटिंगच्या ठिकाणी बाल्कनीत काही तरी काम करत असताना ते उंच इमारतीवरून खाली पडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

Ikram Akhtar: भाईजानच्या रेडी सिनेमाच्या लेखकाला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

अखिल मिश्रा यांनी 3 इडियट्स या सिनेमात साकारलेल्या लायब्रेरियन दुबे यांची छोटी भूमिका आज देखील चाहत्यांच्या लक्षात राहण्यासारखी आहे. या सिनेमात आमिर खान, शर्मन जोशी, करीना कपूर खान, आर माधवन, बोमन इराणी हे मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळाले होते. तसेच त्यांनी अनेक टीव्ही शो आणि सिनेमात काम केले आहे. अखिल यांनी ‘उत्तरन’, ‘उडान’, ‘सीआयडी’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘हातिम’ आणि इतर अनेक लोकप्रिय सिरीयलमध्ये दमदार भूमिका साकारले आहेत. अखिल मिश्रा यांनी अनेक सिनेमामध्येही काम केले आहे. ‘डॉन’, ‘गांधी’, ‘माय फादर’, ‘शिखर’, ‘कमला की मौत’, ‘वेल डन अब्बा’ यांसारख्या अनेक सिनेमात महत्वाच्या भूमिका साकारले आहे.

Exit mobile version