Ikram Akhtar: भाईजानच्या रेडी सिनेमाच्या लेखकाला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Ikram Akhtar: भाईजानच्या रेडी सिनेमाच्या लेखकाला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Ikram Akhtar Arrest: इकराम अख्तर या मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय लेखकाला अटक करण्याची घटना समोर आली आहे. इकराम याने बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाईजानचा (Salman Khan) ‘रेडी’, आणि टायगर श्रॉफचा ‘बागी’, अजय देवगणचा ‘प्यार तो होना ही था’ यासारख्या अनेक मोठ्या सिनेमाचे त्यांनी लेखन केल आहे.


इकराम यांना २२ सप्टेंबर २००३ पर्यंत न्यायालयी कोठडीत सुनावण्याच आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याविरुद्ध सुमारे दीड कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुरादाबाद येथील बांधकाम व्यावसायिक कुलदीप कात्याल यांनी इकराम अख्तरवर ‘आय लव्ह दुबई’ सिनेमा  बनवण्यासाठी त्याच्याकडून सुमारे दीड कोटी रुपये घेतल्याचा धक्कादायक आरोप लावण्यात आला होता. पैसे घेतले परंतु इकराम अख्तर यांनी सिनेमा पूर्ण केला नाही.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

पुढे बांधकाम व्यावयायिकाने दबाव टाकल्याने इकरामने दीड कोटी रुपयांचे चेक बिल्डरला परत दिले होते, परंतु ते बाऊन्स झाल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. नंतर कुलदीपने २०१६ मध्ये इकरामविरुद्ध न्यायालयामध्ये खटला देखील दाखल करण्यात आला होता. हा खटल्याचा निकाल लागला आहे. इकरामला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हिंदी भाषेवरून Prakash Raj यांची अमित शाहांवर जोरदार टीका; यावर कंगनाने थेट म्हणाली…

इकराम अख्तर हे हिंदी मनोरंजन क्षेत्रातील पटकथा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. त्याची ‘इकराम अख्तर अॅक्टर फॅक्टर्स’ नावाची एक अभिनय संस्था देखील सुरु केली आहे. ‘आय लव्ह दुबई’ या सिनेमाचं दिग्दर्शक त्यांनी केले आहे. तसेच ‘रेडी’, ‘थँक्यू’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘नई पडोसन’, ‘चलो इश्क लदाएं’, ‘जोरू का गुलाम’, ‘चल मेरे भाई’, ‘तेरा जादू चल गया’ आणि ‘छोटा चेतन’ या सिनेमाचे ते लेखक आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube