Download App

Mulshi Pattern: ‘मुळशी पॅटर्न’च्या आठवणींना उजाळा देत प्रवीण तरडेंनी शेअर केला तो जुना व्हिडिओ…

6 Years Of Mulshi Pattern: ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) चित्रपटाला प्रदर्शित होऊन 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण या चित्रपटाची लोकप्रियता मात्र अजून कमी झालेली नाही. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपुर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला आज 6 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडेने (Pravin Tarde) चाहत्यांचे आभार मानले आहेत. (social media) तसंच सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर करत ‘मुळशी पॅटर्न’च्या टीम सेलिब्रेशन करत असल्याचे दिसत आहे.


‘मुळशी पॅटर्न’ मराठी सिनेमाच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न ते गुन्हेगारी या सामाजिक विषयावरील विषय प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. सिनेमाच्या विषयामूळे सुरूवातीला हा मराठी सिनेमा घेण्यासाठी कोणीही निर्माते तयार होत नव्हते. पण पत्नीचे दागिने मोडून, मित्रांकडून पै-पै गोळा करून मुळशी पॅटर्न प्रदर्शित केला असल्याचा किस्सा अभिनेते प्रवीण तरडे यांनी अनेकवेळा सांगितला आहे.

”केवळ प्रेक्षकांच्या अभुतपूर्व प्रतिसादामुळे या मराठी सिनेमाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. या सिनेमाचा देशात तब्बल 14 भाषांमध्ये रिमेक करण्यात आला. त्यानंतर ‘सरसेनापती हंबीरराव’ हा मराठीतला पहिला बिगबजेट सिनेमा आपल्या हातून तयार होण्याचे भाग्य मिळाले, असेही तरडे यांनी अभिमानाने सांगितले आहे.

Ek Don Teen Char: ‘एक, दोन, तीन, चारचा’ धमाकेदार टिजर रिलीज!

मराठी सिनेसृष्टीत माझे सलग चार सिनेमे हीट

तरडे यांनी मुळशीसारख्या ग्रामीण भागातून येऊन भारती विद्यापीठ कॉलेजमध्ये कबड्डी खेळाडू, युआर ते एकांकीकेसाठी लेखन करून आणि अनोखा अभिनय करून पुरूषोत्तम करंडक मिळवण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास कथन केल्याचे बघायला मिळाले. दुरचित्रवाहिनीवरील कुंकू, पिंजरा यासारख्या मालिकांसाठी आपण लेखन केले. स्वामी समर्थांवर एका लघुपटासाठी आपल्याला लेखन करायची संधी मिळाली. स्वामी समर्थांबद्दल आपल्याला काही माहित नव्हते. मात्र, हे काम मिळवायचेच हे ध्येय ठेवून काम घेतले आणि लघुपटासाठी घेतलेल्या कामातून आपला पहिला सिनेमा ‘देऊळबंद’ची निर्मिती करण्यात आली. या सिनेमामुळे माझा नास्तिकतेतून आस्तिकतेपर्यतचा प्रवास झाला. मराठी सिनेसृष्टीत माझे सलग चार सिनेमे हीट झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

Tags

follow us