Download App

Marathi Film Award: 60व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिकेस मुदतवाढ

60th State Marathi Film Awards : 60 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

60th State Marathi Film Awards : 60 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या ( Marathi Film Award) प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता 31 मे 2024 पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार असल्याची माहिती देण्यात आली. (Film Awards)  त्यामुळे निर्मात्यांनी सन 2022 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील (Swati Mhase Patil) यांनी यावेळी केले आहे.


मराठी चित्रपटसृष्टीत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हा मानाचा पुरस्कार आहे. राज्य शासनाच्या वतीने या पुरस्कारासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-65 येथील जनसंपर्क विभागात कार्यालयीन वेळेत प्रवेशिका उपलब्ध असणार आहेत.

Swapnil Joshi: … आणि म्हणून मी प्रत्येक प्रमोशनसाठी जातोय, अभिनेत्याने व्यक्त केला आनंद

मराठी चित्रपटसृष्टीत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार बाबत www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर देखील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याच ठिकाणी विहित मुदतीत परिपूर्ण प्रवेशिका सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

follow us