Download App

प्यार… इश्क… लेकिन पहले जैसा! मनीष मल्होत्रांच्या ‘गुस्ताख इश्क’ मधून धाडसी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला

Gustakh Ishq या मनीष मल्होत्राच्या पहिल्या चित्रपटसह, त्याच्या ‘स्टेज5’ प्रॉडक्शन बॅनरखाली तो चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल ठेवत आहे.

a bold love story from manish malhotra’s ‘Gustakh Ishq’ presented to the audience in upcoming november : प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा कायमच चित्रपटांचा मोठा चाहता राहिलेला आहे. लहानपणीच चित्रपटसृष्टीच्या रंग, संगीत आणि कथेच्या जादुई जगाने त्याला मोहित केले होते. फॅशन जगात नाव कमावण्याच्या खूप आधीपासून सिनेमाने त्याच्या कल्पनाशक्तीला आकार दिला होता. आता हा अस्सल सिनेमाप्रेमी इतर सिनेमाप्रेमींसाठी नोव्हेंबर 2025 मध्ये एक खास पर्वणी घेऊन येतो आहे. यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘गुस्ताख इश्क’ या त्याच्या पहिल्या चित्रपटसह, त्याच्या ‘स्टेज5’ प्रॉडक्शन बॅनरखाली तो चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल ठेवत आहे.

जरांगेंविरोधात सदावर्ते मैदानात! मुंबईकडे कूच करण्याआधीच गुन्हा दाखल करून अटकेची केली मागणी

हा चित्रपट जुन्या दिल्लीच्या गल्लीबोळात आणि पंजाबच्या लुप्त होत चाललेल्या कोठीमध्ये घडतो. ‘गुस्ताख इश्क’ ही एक प्रेमकथा आहे जी उत्कटता आणि अव्यक्त भावनांना व्यापून टाकते. ही धाडसी प्रेमकथा अशा जगाने प्रेरित आहे, जिथे वास्तुकला आठवणींना कैद करते आणि संगीत हृदयाची तळमळ व्यक्त करते. चित्रपटाचे दिग्दर्शन विभू पुरी यांनी केले आहे आणि त्यात विविध सर्जनशील प्रतिभांचा समावेश आहे. चित्रपटाचे संगीत विशाल भारद्वाज यांनी केले आहे तर गीतकार आहेत गुलजार. चित्रपटासाठी ध्वनी रेसूल पुकुट्टी तर छायांकन मानुष नंदन यांनी केले आहे. या चित्रपटात आधुनिक बॉलिवूडची ओळख दर्शविणारी कलाकारांची टीम आहे ज्यात अनुभवी नसीरुद्दीन शाह, प्रतिभावान विजय वर्मा, फातिमा सना शेख आणि शरीब हाश्मी यांचा समावेश आहे.

चित्रपटांवर माझे प्रेम – मनीष मल्होत्रा

आपल्या पहिल्या चित्रपटनिर्मितीच्या अनुभवाबद्दल भावना व्यक्त करताना मनीष मल्होत्रा म्हणाला की, “चित्रपटावरील माझे प्रेम बालपणापासूनचे आहे. रंग, संगीत आणि कथांनी माझ्या कल्पनाशक्तीला चालना दिली आणि मला डिझायनर बनण्याची प्रेरणा दिली. आज चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल ठेवणे म्हणजे माझ्यासाठी मला सर्वकाही देणाऱ्या माध्यमाला चित्रपटाला परत देण्यासारखे आहे. स्टेज5 प्रॉडक्शनसह, आम्ही नेहमीच नवनवीन कथा आणि चित्रपटांद्वारे काहीतरी नाविन्यपुर्ण आणि प्रेरणादायी आणण्याचे ध्येय ठेवले आहे”.

मोठी बातमी! लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर बीडमध्ये दगडफेक, वातावरण चिघळलं, वाचा काय घडलं?

मनीष मल्होत्राचा भाऊ दिनेश मल्होत्रा ​​यांच्यासोबतचा स्टेज5 प्रॉडक्शन अंतर्गत निर्मित, गुस्ताख इश्क हा त्याच्यासाठी एक नवीन अध्याय आहे. हा चित्रपट क्लासिक स्टोरीटेलिंगचा जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सोनेरी भविष्याकडे एक पाऊल पुढे टाकणारा हा सिनेमा असेल यात शंका नाही. आपल्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या या कथेला चित्रपटाच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत नोव्हेंबर 2025 मध्ये.

follow us