A mix of mythology, crime and justice! Trailer of ZEE 5’s upcoming series Devkhel released : चंद्रकांत लता गायकवाड दिग्दर्शित आणि निखिल पालांडे तसेच गौरव रेळेकर लिखित, सिने मास्टर्स प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित, कोकणी लोककथेत रुजलेला हा चित्तवेधक मानसशास्त्रीय गुन्हेगारी थरारपट 30 जानेवारी रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
‘दो दीवाने सहर में’ मधील प्रेममय गाणं ‘आसमा’ काही तासांत येणार प्रेक्षकांच्या भेटीला !
मराठी ZEE5 ने आज त्याच्या आगामी मराठी ओरिजनल सिरीज Devkhel (देवखेळ)चा ट्रेलर प्रदर्शित केला. कोकणातील फारशा ऐकिवात नसलेल्या लोककथांपासून प्रेरित, देवखेळ हा एक गहन मानसशास्त्रीय थरारपट आहे. जो शिमगा (होळी) सणाच्या भीतीदायक पार्श्वभूमीवर परंपरा, अंधश्रद्धा आणि गुन्हेगारी यांची सरमिसळ करतो. ही सिरीज दिनांक 30 जानेवारीपासून खास ZEE5 वर स्ट्रीम होणार आहे.
29 पालिकांच्या महापौरपदाचे भवितव्य आज ठरणार: मंत्रालयात थोड्याचवेळात आरक्षणाची सोडत
रत्नागिरी जिल्ह्यातील देवताली किनारपट्टीवरील गावावर आधारित, देवखेळ एका थरारक रहस्यावर आधारित आहे- दरवर्षी होळी पौर्णिमेच्या रात्री, एखाद्याचा मृत्यू होतो. हे मृत्यू न्यायाचे प्रतीक म्हणून स्थानिक पातळीवर पूजल्या जाणाऱ्या शंकासुर या पौराणिक लोककथा व्यक्तिरेखेनेने दिलेल्या दैवी शिक्षेची कृत्ये आहेत, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. ट्रेलरमध्ये अशा जगाची झलक दाखवण्यात आली आहे. जिथे श्रद्धा तर्कशक्तीवर मात करते. भीती ही शांततेला अधोरेखित करते आणि सत्य विधीत दडलेले असते.
कल्याण-डोंबिवलीत महापौर कोणाचा? भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी दिले मोठे संकेत…
जेव्हा इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे गावात येतो, तेव्हा तो अंधविश्वासाला स्पष्टीकरण म्हणून स्वीकारण्यास नकार देतो. ही काळजीपूर्वक लपवून केलेली हत्या असल्याचे त्याचे मत असते. त्याचा तपास सुरू करतो. या मालिकेत इन्स्पेक्टर विश्वास सरंजामेच्या भूमिकेत अंकुश चौधरी असून प्राजक्ता माळी, यतीन कार्येकर, अरुण नलावडे, वीणा जामकर आणि मंगेश देसाई यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
