Download App

नवी वाट, नवा प्रवास: स्टार प्लस शो अनुपमाच्या आयुष्यात येणार नवे वळण!

Anupama : भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि प्रेक्षक स्वत:ला सहज रिलेट करू शकतील, अशा ‘स्टार प्लस’वरील ‘अनुपमा’ या मालिकेच्या कथानकाने देशभरातील

Anupama : भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि प्रेक्षक स्वत:ला सहज रिलेट करू शकतील, अशा ‘स्टार प्लस’वरील ‘अनुपमा’ या मालिकेच्या कथानकाने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील मुख्य भूमिकेत रूपाली गांगुली (Rupali Ganguly) असून सामाजिक अपेक्षांपेक्षा स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची निवड करणाऱ्या एका महिलेच्या प्रवासाचे सुरेख चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. पारंपरिक घरात तिने केलेल्या संघर्षांपासून स्वतःचा आवाज शोधण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास आहे. कालांतराने, ही मालिका तिची आव्हाने, त्याग आणि ताकद प्रतिबिंबित करत त्या व्यक्तिरेखेसह विकसित होत गेली आहे.

प्रत्येक नवीन टप्प्यासह, ‘अनुपमा’ पुनश्च नव्याने प्रारंभ करण्याचा अर्थ परिभाषित करत राहाते. आता, या मालिकेची कथा तिचा आणखी एक नवा अध्याय उलगडण्यास सज्ज झाली आहे. ‘अनुपमा’ मालिकेचा नवा प्रोमो या कथेत एक महत्त्वपूर्ण बदल सूचित करतो, ज्यामुळे मालिकेच्या कथेतील भावनिक दृष्टिकोनात एक आश्चर्यकारक बदल होत असल्याची जाणीव प्रेक्षकांना होईल. ‘अनुपमा’ आता मुंबईत आहे, असे शहर जे कल्लोळाचे आहे, आणि ती मात्र येथे नि:शब्दतेत मार्गक्रमण करीत आहे. लोकल ट्रेनमध्ये एकटी प्रवास करताना, ती भावनिकदृष्ट्या तुटलेली दिसते, मागे ठेवून आलेल्या संघर्षांपासून आणि नात्यांपासून जाणूनबुजून तिने तुटलेपण स्वीकारलेले आहे.

हे फक्त शारीरिक अंतर नाही, तर तिने मागे वळून पाहण्यास दिलेला शांत नकार आहे. पण या कोलाहलात, एक क्षण तिच्या आत्म्याला हळूवारपणे स्पर्श करतो. ती एका नृत्य प्रशिक्षकाला युवतींना प्रशिक्षण देत असताना पाहते, हे एक साधेसे दृश्य आहे, जे तिने तिच्या स्वतःच्या मुलीला नृत्य करायला कसे शिकवले होते, याची आठवण तिला करून देते. तिचे डोळे भरून येतात, काळीज तुटण्याच्या आणि आशेच्या हिंदोळ्यात तिचे मन हेलकावे घेते. त्या क्षणभरात, आपल्याला तिच्या मनाचे घाव भरून येण्याची शक्यता दिसते, कदाचित तिच्या उत्कट आवडीतून, ती हळूहळू मोडून पडलेली गोष्ट पुन्हा निर्माण करू शकेल, असे वाटते.

हगवणे कुटुंबाचा कारनामा, बैलासमोर ठेवला गौतमी पाटीलचा कार्यक्रम

हा प्रोमो जीवनात मागे पडलेल्या गोष्टींतून भविष्यातील अज्ञाताकडे होत असलेल्या संक्रमणाची एक शक्तिशाली जाणीव आहे. ही एक नवी, धाडसी सुरुवात आहे, ज्यामध्ये एकांतता, शक्ती आणि शांतपणे सावरणे आहे. या नव्या शहरात अनुपमाची वाट कोण बघत आहे? ती पुन्हा एकदा स्वतःला शोधू शकेल? तिचा नवा अध्याय 4 जूनपासून रात्री 10 वाजता फक्त ‘स्टार प्लस’वर उलगडणार आहे. जरूर पाहा.

follow us