दमदार एपिसोड! स्टार प्लसचा गणपती स्पेशल धमाका, शिवम खजुरियाने दिली हिंट

दमदार एपिसोड! स्टार प्लसचा गणपती स्पेशल धमाका, शिवम खजुरियाने दिली हिंट

Star Plus Ganpati Special Episodes : या गणेश चतुर्थीला (Ganesh Chatuurthi) स्टार प्लस आपल्या प्रेक्षकांसाठी भावना, नाट्य आणि भक्तीने परिपूर्ण असा एक भव्य सोहळा घेऊन येत आहे. सणासुदीच्या निमित्ताने कुटुंबांना एकत्र आणण्याची आपली परंपरा चालू ठेवत, ही वाहिनी गणपती स्पेशल (Star Plus) एपिसोड प्रसारित करणार आहे, ज्यामध्ये अनुपमा, ये रिश्ता क्या कहलाता है, उडने की आशा, झनक आणि आरती अंजली अवस्थी या लोकप्रिय मालिकांचा समावेश असेल. या प्रत्येक मालिकेत या पर्वाशी संबंधित नाट्य गुंफलेले दिसेल. त्यामुळे मनोरंजनाने भरलेली ही रजनी असेल.

भावपूर्ण क्षणांची झलक

हे खास भाग सणाचा स्वाद कथानकात मिसळून कथानकास पुढे नेतील. या मालिकांमध्ये गणेश पर्वाच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक नात्यांची परीक्षा होईल, जीवन पालटून टाकणारे निर्णय घेतले जातील आणि जबरदस्त ट्विस्ट प्रेक्षकांना बघायला मिळतील. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये प्रत्येक मालिकेतील अशा भावपूर्ण क्षणांची झलक आधीच बघायला मिळाली आहे.

‘राज्यातील तीन हजार महिला सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार’, CM फडणवीसांची घोषणा!

अनुपमा मालिकेत प्रेमची भूमिका करणारा शिवम खजुरिया (Shivam Khajuria) गणेश स्पेशल एपिसोडबाबत आपला उत्साह व्यक्त करत म्हणाला, “हा भाग खूप खास असणार आहे. सण नेहमीच खूप आनंद घेऊन येतात आणि पडद्यावर आनंदोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने मला रंगीबेरंगी, पारंपरिक पोशाख परिधान करायला मिळणार याचा मला आनंद होत आहे. यंदा गणेशोत्सव आणखी रोमांचक आहे, कारण मुंबई टीम सध्याच्या कथानकाचा देखील भाग (Entertainment News) आहे. त्यामुळे ऊर्जा दुप्पट असणार आहे. गणपती बाप्पा मोरया!”

मोठा आनंद सोहळा

हा एपिसोड कशामुळे उठून दिसेल हे सांगताना तो पुढे म्हणाला, “सणाच्या निमित्ताने सादर होणाऱ्या एपिसोडमध्ये नेहमी अधिक नाट्य आणि अधिक भावना असतात. पण हा भाग अधिक विशेष असण्याचे कारण म्हणजे तो डान्स स्पर्धेच्या फिनालेच्या अगदी अगोदर होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सणाचा उत्साह तर दिसेलच, शिवाय स्पर्धेचा तणाव आणि रोमांच देखील अनुभवता येईल. प्रेम म्हणतो, त्याप्रमाणे, “इस कॉम्पिटिशन में जीत किसी की भी हो, हार सबकी होगी.”

छत्री बाहेर काढा विश्रांतीनंतर आज पुन्हा ‘कोसळ’धार; ‘या’ 7 जिल्ह्यांना अलर्ट जारी

प्रेक्षकांसाठी मालिकेत पुढे काय काय आहे याबद्दल बोलताना शिवम म्हणाला, “हा एक मोठा आनंद सोहळा असणार आहे. त्यात अनेक रंग आणि सणाची ऊर्जा असेल तसेच अनपेक्षित कलाटण्या देखील असतील. हा रोमांच आणि उत्साहाने भरलेला खूप जबरदस्त एपिसोड असणार आहे.” भक्ती, नाट्य आणि एकत्र येण्याचा हा सोहळा साजरा करायला विसरू नका; केवळ स्टार प्लसवर.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube