छत्री बाहेर काढा विश्रांतीनंतर आज पुन्हा ‘कोसळ’धार; ‘या’ 7 जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Weather Update : मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली (Maharashtra Weather Update) आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. यंदा पावसाने राज्यात चांगलाच (Heavy Rain) धूमाकूळ घातला. अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. नद्यांना पूर आला, गावांचा संपर्क तुटला. लोकांच्या घरात पाणी शिरले. पिकांचे नुकसान झाले.
अतिमुसळधार पावसाचा मोठ्या शहरांना मोठा फटका बसला. या संकटातून काहीसा दिलासा मिळालेला असतानाच हवामान विभागाच्या नव्या अंदाजाने धाकधूक (IMD Rain Alert) पुन्हा वाढू लागली आहे. राज्यात गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच पाऊस पुन्हा हजेरी लावणार आहे. राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून 7 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत ढगाळ हवामान राहील. तसेच काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात आज ढगाळ हवामान राहील तसेच काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुण्याला पावसाचा यलो अलर्ट
आज पुण्याला हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील. सातारा आणि कोल्हापूरला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात हवामान सामान्य राहील. या भागातील एकाही जिल्ह्यात पावसाचा अंदाज नाही. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील नागपूर शहरात (Nagpur Rains) तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. येथे तापमान 33 अंशापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. वातावरण ढगाळ राहणार असून हलक्या पावसाची देखील शक्यता आहे. विदर्भातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा (Weather Update) इशारा देण्यात आलेला नाही.
कोकण, उत्तर महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पाऊस
कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत आजपासून मंगळवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे या जिल्ह्यांत 26 ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस होईल. पालघर जिल्ह्यात मंगळवारी काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. धुळे, जळगाव आणि नंदूरबार या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. या तीन जिल्ह्यांत सोमवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्यात पाळणा योजना सुरू होणार