Ganeshotsav festival: ‘गणेशोत्सवा’ला आता राज्य महोत्सवाचा दर्जा; अध्यात्म नाट्यरंगही रंगणार

Ganeshotsav festival:  ‘गणेशोत्सवा’ला आता राज्य महोत्सवाचा दर्जा; अध्यात्म नाट्यरंगही रंगणार

Ganeshotsav now status of the state festival : महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाल (Sarvajanik Ganeshotsav) ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. ही घोषणा 14 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेला (Ashish Shelar) यांनी केली. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

येवल्यात शेतकरीच स्वातंत्र्यदिनी करणार कर्जमुक्तीची घोषणा; भागवतराव सोनवणे 

यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’चा दर्जा मिळाल्याने त्याचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले. सरकारच्या या निर्णयामुळे हा उत्सव जागतिक पातळीवर महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतीक म्हणून प्रस्थापित होण्यास मदत होईल.

महत्वाचे निर्णय :
– सार्वजनिक ‘गणेशोत्सव’ राज्य महोत्सव म्हणून घोषित
– भजनी मंडळांना भांडवली खर्चासाठी 5 कोटींचे अनुदान
– गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सव
– राज्य महोत्सवानिमित्त टपाल तिकिट, विशेष नाणे प्रसिध्द
– बाप्पांच्या ऑनलाईन दर्शनासाठी पोर्टलची निर्मिती केली जाणार
– गणपती विषयक रिल्स स्पर्धांचे आयोजन केले जाणार
– गिरगाव चौपाटीवर ड्रोन महोत्सवाचे आयोजन
– प्रमुख शहरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube