A unique play based on the stories of Mahasweta Devi : मराठी रंगभूमीवर आता एक आगळेवेगळे नाटक आले आहे. प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांच्या तीन कथांवर आधारित हे नाटक आहे. ‘काली बिल्ली प्रॉडक्शन्स‘ या संस्थेची निर्मिती असलेले हे नाटक सावित्री मेधातुल यांनी लिहिले असून, या नाटकाची निर्मितीही त्यांनी केली आहे. नाटकाचे दिग्दर्शक मंगेश सातपुते आहेत. नाटकाचे नेपथ्य व वेशभूषा अशी जबाबदारी सुमित पाटील यांनी सांभाळली आहे.
नाटकाला विक्रम होता यांनी संगीत दिले असून, प्रकाशयोजना विलास हुमणे यांनी केली आहे. या नाटकात हृदयनाथ जाधव, विक्रम होता, मुक्ती साधना आणि सावित्री मेधातुल हे चार कलाकार भूमिका साकारत आहेत. आपल्याच समाजमनाचा आरसा दाखवणारी ही नाट्यकृती आहे. लेखिका सावित्री मेधातुल यांनी यापूर्वी त्यांच्या कलाकृतींतून व संशोधन प्रकल्पांतून लावणी आणि लोककलेचा वारसा नाट्यरसिकांपर्यंत पोहोचवला आहे.
बारामतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार रिंगणात; शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही?
आता ‘महोगाथा’ नाटकाच्या माध्यमातून त्या एक वेगळा सामाजिक विषय प्रेक्षकांसमोर घेऊन आल्या आहेत. सध्याच्या काळात सभोवती घडत असलेल्या विविध घटनांना प्रतिसाद म्हणून हे नाटक केले आहे. प्रेक्षकांना मनोरंजन तर हवेच असते, पण त्यासह विचारप्रवृत्त करायला लावणाऱ्या कलाकृतीची आवडही त्यांना असते. त्याप्रकारचे हे नाटक आहे. या नाटकाचा फॉर्म थोडा वेगळा आहे. आपल्याकडे सांगितल्या जाणाऱ्या विविध गोष्टींचा फॉर्म या नाटकात वापरला आहे. हे नाटक रंगभूमीवर तर केले जाणारच आहे, पण त्या व्यतिरिक्तही उपलब्ध जागेत हे नाटक सादर करता येऊ शकते, अशी या नाटकाची रचना आहे. मनोरंजनासह महत्त्वाचा विचार देणारे हे नाटक आहे.
