ट्रेलरनंतर देशभर घुमणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा जलवा; 7–8 शहरांमध्ये होणार मेगा प्रमोशन

सूत्रानुसार, 11 ऑगस्टला ट्रेलर रिलीज झाल्यानंतर 'मिर्झापूर: द मूव्ही'ची टीम मोठ्या प्रमाणावर प्रमोशनला सुरुवात करणार आहे.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 08 01T142024.107

The Magic of ‘Mirzapur: The Movie’ : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या निर्मात्यांनी नुकताच चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित केला, ज्यातून चाहत्यांना या आयकॉनिक फ्रँचायझीच्या मोठ्या पडद्यावरील रूपांतराची पहिली झलक पाहायला मिळाली. पंकज त्रिपाठी, अली फझल आणि दिव्येंदू शर्मा पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या लाडक्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. या टीझरने प्रेक्षकांना एका भव्य सिनेमॅटिक अनुभवाचे आश्वासन दिले आहे, ज्यामध्ये तोच अॅक्शन, इंटेन्स ड्रामा आणि दमदार कथानक पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे ‘मिर्झापूर’ला एक वेगळी ओळख मिळाली.

चित्रपटाशी संबंधित एका जवळच्या सूत्रानुसार, 11 ऑगस्टला ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम मोठ्या प्रमाणावर प्रमोशनला सुरुवात करणार आहे.निर्माते 7 ते 8 शहरांमध्ये विशेष मल्टी-सिटी ट्रेलर लॉन्च रोड ट्रिपची तयारी करत आहेत. या दौऱ्यात चित्रपटातील प्रमुख कलाकार देशभरातील विविध शहरांना भेट देऊन चाहत्यांशी संवाद साधतील आणि थिएटर रिलीजपूर्वी ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा भौकाल थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतील.

सिरसाळ्यात धनंजय मुंडेंची भावनिक खंत; आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही, एकाला घरी बसावं लागलं

या दमदार स्टारकास्टमध्ये अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी आणि सोनल एस. चौहान यांचाही समावेश आहे. हे सर्व कलाकार मिर्झापूरच्या विश्वातील एक नवे आणि रोमांचक पर्व मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहेत.

‘मिर्झापूर: द मूव्ही’ची प्रस्तुती Amazon MGM Studios आणि Excel Entertainment करत आहेत. गुरमीत सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली आणि पुनीत कृष्णा यांच्या लेखणीतून साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली असून, कासिम जगमागिया आणि विशाल रामचंद्रानी हे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट 4 सप्टेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा भौकाल आणखी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे.

follow us