Aadesh Bandekar यांच्या मुलाची ‘होम मिनिस्टर’ कशी असणार? सोहम बांदेकरने स्पष्टच सांगितलं

Aadesh Bandekar : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar ) म्हटलं की, त्यांना त्यांच्या नावापेक्षा महाराष्ट्रातील त्यांचे लाडके भाऊजी म्हणूनच जास्त ओळखतात. त्यात आता याच लाडक्या भाऊजींची सूनबाई म्हणजे त्यांच्या मुलाची होम मिनिस्टर कशी असणार? हे आदेश बांदेकर यांचा मुलगा आणि अभिनेता सोहमने स्पष्ट सांगितलं आहे. एन्व्हलोप पाठवतो, त्यात ठाकरेंच्या लंडनमधील प्रॉपर्टीचे तपशील; कबोज यांचा राऊतांना इशारा […]

Aadesh Bandekar यांच्या मुलाची 'होम मिनिस्टर' कशी असणार? सोहम बांदेकरने स्पष्टच सांगितलं

Aadesh Bandekar

Aadesh Bandekar : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar ) म्हटलं की, त्यांना त्यांच्या नावापेक्षा महाराष्ट्रातील त्यांचे लाडके भाऊजी म्हणूनच जास्त ओळखतात. त्यात आता याच लाडक्या भाऊजींची सूनबाई म्हणजे त्यांच्या मुलाची होम मिनिस्टर कशी असणार? हे आदेश बांदेकर यांचा मुलगा आणि अभिनेता सोहमने स्पष्ट सांगितलं आहे.

एन्व्हलोप पाठवतो, त्यात ठाकरेंच्या लंडनमधील प्रॉपर्टीचे तपशील; कबोज यांचा राऊतांना इशारा

आदेश बांदेकर आणि त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांना एक मुलगा आहे. सोहम बांदेकर त्याने अभिनय क्षेत्रात देखील पदार्पण केलं आहे. तसेच तो दिग्दर्शन देखील करत आहे. त्यामुळे आदेश बांदेकर यांचं पूर्ण कुटुंबच चित्रपटसृष्टीमध्ये आहेत. त्यात नुकतच त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांचा बाईपण भारी देवा हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर आता त्या झिम्मा 2 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येणार आहेत.

तर सोहम बांदेकर याने काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह या वाहिनीवरील लक्ष्य या मालिकेत पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकोरली होती. तसेच तो सोशल मिडीयावर देखील प्रचंड सक्रिय असतो. त्यामुळे तो त्याच्या चाहत्यांची संवाद देखील साधत असतो. असंच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. यावेळी चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले.

‘भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा नाहीतर माफी मागा’; सुप्रिया सुळेंनी धमकावूनच सांगितलं

त्यावेळी एका तरूणाने त्याला लग्नाविषयी प्रश्न विचारला. या तरूणाने विचारले की, तुला बायको कशी हवी? तेव्हा सोहमने आपल्याला होणारी बायको कशी हवी? याचं उत्तर दिलं. यावेळी त्याने सांगितलं की, त्याला ‘बायको म्हणून कशीही मुलगी चालेल पण ती फक्त आईला आवडायला हवी बस.’ असं म्हणत सोहम बांदेकर याने आपल्याला भावी पत्नी कशी हवी याचं स्पष्ट उत्तर दिलं आहे.

Exit mobile version