“बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष”; ठाकरेंची CM शिंदेंवर बोचरी टीका
मुंबई : गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आले. नंतर पोलिसांनीही सांगितले की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले आहे, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर बोचरी टीका केली. (Aditya Thackeray criticizes Eknath Shinde after Sada Saravankar’s appointment as Chairman of Siddhivinayak Nyas Mandir)
दादर-माहिमचे शिवसेना आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची श्री. सिद्धीविनायक गणपती मंदीर विश्वस्थ व्यवस्था, व्यवस्थापन समितीचे (न्यास) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांची 23 जुलै 2023 रोजी मुदत संपुष्टात आली आहे. त्यानंतर शिंदे सरकराने सरवणकर यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे. हाच निर्णय जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदेंवर टीका केली.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
दादरमध्ये ह्यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आले. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले.
दादरमध्ये ह्यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती.
त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 7, 2023
हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती! पण… ह्या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय! मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून ह्या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता… पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्रद्वेषाचं बक्षीस दिलं असेल…
हवेतील गोळीबाराप्रकरणी सदा सरवणकर चर्चेत :
गतवर्षी गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा झाला होता. त्या राड्यात हवेत गोळीबार केल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत आले होते. याप्रकरणी चौकशी झाल्यानंतर सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती. मात्र आता याच प्रकरणाचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.