एन्व्हलोप पाठवतो, त्यात ठाकरेंच्या लंडनमधील प्रॉपर्टीचे तपशील; कबोज यांचा राऊतांना इशारा

  • Written By: Published:
एन्व्हलोप पाठवतो, त्यात ठाकरेंच्या लंडनमधील प्रॉपर्टीचे तपशील; कबोज यांचा राऊतांना इशारा

Mohit Kamboj on Sanjay Raut : गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या एका फोटोची राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊ येथे जाऊन कॅसिनोमध्ये जुगार खेळल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यांनी बावनकुळेंचा फोटोही शेअर केला आहे. राऊतांनी केलेल्या दाव्यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. आता भाजपचे प्रवक्ते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

‘भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा नाहीतर माफी मागा’; सुप्रिया सुळेंनी धमकावूनच सांगितलं 

आज माध्यमांशी बोलतांना मोहित कंबोज म्हणाले की, दोन दिवसांपुर्वी संजय राऊत यांनी दावा की, की चंद्रशेखर बावनकुळे साडे ३ कोटी रूपये जुगारात हरले. असे भलते-भलते आकडे संजय राऊत आणतात तरी कुठून? राऊतांकडे याचे काही पुरावे आहेत का? त्यांनी आधी माझ्यावरही असेच काहीही आरोप केले आणि नंतर मी बोललो की लगेच पळून केले, असं कंबोज म्हणाले.

संजय राऊत यांनी मकाऊत उद्धव ठाकरेंचे किती हॅाटेल आहेत ? ठाकरे परिवाराची विदेशात कुठे कुठे बेनामी संपत्ती आहे? लंडनमध्ये ठाकरेंची कुठे कुठे प्रॅापर्टी आहे? याबद्दल राऊतांनी बोलावं, असंही कंबोज म्हणाले.

टीमला दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन बनविलेल्या खेळाडूवर ICC ची कारवाई; क्रिकेटपासून लांब रहावं लागणार! 

यावेळी बोलतांना कंबोज यांनी ठाकरे कुटुंबाच्या परदेशवाऱ्यांवरूनही हल्लाबोल केला. ते म्हणाले, इतकच काय तर ठाकरे परदेशात जाताना तिकीट कोण काढतं, त्यांचं तिथलं बिल कोण भरतात, हे सांगू का? राऊतांना एक एन्व्हलोप पाठवतोय, ज्यामध्ये कोणी किती शॅापिंग केलं? कोणी किती कोटींच घड्याळ घेतलं आणि काय काय आयात केलं? याचे तपशील आहेत, असा इशारा दिला. याचीही राऊतांनी चर्चा करावी तर चांगल होईल, असं कंबोज म्हणाले.

राऊत यांनी काय ट्विट केले आहे?

संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनोमध्ये जुगार खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी पोस्ट करतांना लिहिलं की, 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मकाऊत सुमारे 3.50 कोटी रुपये कॅसिनोत जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदूत्ववादी असल्यानं महाशय द्युत खेळले तर बिघडलं कुठं? ते तेच आहेत ना? महाराष्ट्र पेटला आणि हे गृहस्थ मकाऊच्या कॅसिनोमध्ये जुगार खेळत आहेत. फोटोवर झूम करून पाहा. हे तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube