सातारा बँकेचा आखाडा गाजणार; चार मंत्री, आमदार, आजी-माजी खासदार रिंगणात !
Satara Bank Election : शेवटच्या दिवशी चार मंत्री, एक खासदार, एक आमदार, माजी खासदारांनी उमेदवारी दाखल करत धुराळा उडून दिलाय.
The Satara District Central Co-operative Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ( Satara District Central Co-operative Bank )अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला आहे. बँकेच्या 21 संचालकांसाठी 236 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात साताऱ्यातील दिग्गज राजकारणी, राजकारणांचे मुलेही रिंगणार उतरणार आहे. शेवटच्या दिवशी चार मंत्री, एक खासदार, एक आमदार, माजी खासदारांनी उमेदवारी दाखल करत धुराळा उडून दिलाय. अर्ज करणाऱ्यांची नावे बघितली तर महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.
‘आज माझं खुश आहे मन, कारण ठाकरे बंधू करताहेत आंदोलन’; रामदास आठवलेंचा ठाकरे बंधूंना टोला
सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) , मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद आबा पाटील (राष्ट्रवादी), ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (भाजप), पालकमंत्री शंभूराज देसाई (शिवसेना) असे चार मंत्रीच रिंगणात उतरलेत. बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष खासदार नितीन पाटील, खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार डॉ अतुल भोसले, आमदार धैर्यशील कदम, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विद्यमान संचालक तथा माजी मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी आमदार दीपक चव्हाण हे दिग्गज बँकेच्या आखाड्यात उतरले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे शेखर गोरे, शिवरुपराजे यशवंतराव निंबाळकर, सुनेत्रा पवार, डी. के. पवार, सुरभी भोसले, अविनाश कदम, नितीन भरगुडे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
शाळेच्या सहलीची धमालमस्ती 9 ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर “सहल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच
आता अर्ज माघारीकडे लक्ष
1 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल झाले असून, 5 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 6 ते 21 ऑक्टोबरपर्यंत आहे. तर 1 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 3 नोव्हेंबर मतमोजणी होणार आहे. अर्ज माघारीच्या मुदतीनंतरच निवडणुकीचे अंतिम आणि स्पष्ट राजकीय चित्र समोर येईल. तरी सध्याच्या उमेदवारी अर्जांवरून महायुतीतील घटक पक्ष व स्थानिक गटांमध्ये राजकीय संघर्ष रंगत आहे.
भाजप स्वबळावर रिंगणात उतरणार ?
एकंदरीत साताऱ्याचे महायुतीमधील राजकारण पाहता भाजप स्वबळावर लढू शकतो. कारण अनेक तालुक्यांमध्ये राजकीय समीकरण तसेच आहे. तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वांमध्ये जोरदार संघर्ष आहेत. त्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका स्वबळावर निवडणूक लढण्याची आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा-पुन्हा स्बळाची भाषा वापरली आहे. अशा परिस्थितीमघ्ये भाजप एक पॅनेल आणि उर्वरित राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना मिळून पॅनेल तयार होऊन फाइट होण्याची शक्यता आहे.