Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या आयुष्यात आता ‘ही’ तिसरी बाई

प्रेरणा जंगम Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिका विविध वळण घेताना दिसत आहे. प्रत्येक भागात प्रेक्षकांना आकर्षित करणारे विविध ट्विस्ट पाहायला मिळतात. यातच या मालिकेत आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत (Serial) आता नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. अरुंधती आणि अनिरुद्धची मुलगी ईशाच्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 10T144532.681

Aai Kuthe Kay Karte

प्रेरणा जंगम

Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिका विविध वळण घेताना दिसत आहे. प्रत्येक भागात प्रेक्षकांना आकर्षित करणारे विविध ट्विस्ट पाहायला मिळतात. यातच या मालिकेत आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत (Serial) आता नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. अरुंधती आणि अनिरुद्धची मुलगी ईशाच्या साखरपुड्यात खास एन्ट्री पाहायला मिळणार आहे.

आशुतोषची बहीण वीणा या साखरपुड्यात एन्ट्री करताना दिसणार आहे. वीणा आशुतोषच्या आयुष्यात परत येणार आहे. वीणा ही अनिरुद्धची बिझनेस पार्टनर आहे. त्यामुळे हा मोठ्या ट्विस्ट मालिकेत लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. वीणा हे पात्र मालिकेत दाखल झाल्याने मालिकेचं कथानक वेगळं वळण घेताना दिसणार आहे. अनेकदा मालिकेत वीणाचा उल्लेख झाला आहे. त्यामुळे तिची मालिकेत एन्ट्री होईल की नाही याबद्दल प्रेक्षकांनाही प्रश्न पडला होता.

राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी

मात्र वीणाची एन्ट्री मालिकेत मोठ्या ट्विस्ट घेऊन येत आहे. मराठी मालिकाविश्वातीला प्रसिद्ध अभिनेत्री वीणा हे पात्र साकारणार आहे. अभिनेत्री खुशबू तावडे ही वीणाच्या भूमिकेत दिसणार आहे. खुशबू गेल्या अनेक वर्षे मराठी मालिकाविश्वात काम करत आहे. मराठीसह तिने हिंदी टेलिव्हीजनवरही तिने काम केल आहे. आम्ही दोघी या मालिकेत तिने मीराची भूमिका साकारली होती. तर तेने बीन या हिंदी मालिकेत ती झळकली होती. विविध मराठी चित्रपटातही तिने काम केली आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्धची बिझनेस पार्टनर बनलेली वीणा त्याची लाईफ पार्टनर बनेल का ? वीणाच्या येण्याने संजना आणि अरुंधतीची काय प्रतिक्रिया असेल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Exit mobile version