Aalim Hakim Makes His Blockbuster Big-Screen Debut in Bosco Martis’ New BLM Music Song Paisa Phek : स्टाईल आणि करिष्म्याचा भन्नाट जलवा अनुभवण्यासाठी सज्ज व्हा! प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट आलिम हकीमने बॉस्को मार्टिस यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या दमदार नव्या अँथम ‘पैसा फेक’मधून मोठ्या पडद्यावर दणक्यात पदार्पण केलं आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार थेट जनतेपर्यंत पोहोचवणार! केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
‘पैसा फेक’ ही एक अनोखी सिनेमॅटिक निर्मिती असून, या गाण्यात प्रेक्षकांना थेट एका भव्य आणि जुन्या काळातील आलिशान कॅसिनोच्या दुनियेत घेऊन जाण्यात आलं आहे. आकर्षक दृश्यरचना, हटके कोरिओग्राफी आणि रेट्रो अंदाजामुळे हे गाणं खास ठरतं. आलिम हकीम आपल्या भन्नाट स्वॅग आणि स्टाईलने पडदा गाजवताना दिसतो. मोठ्या पडद्यावरील त्याची दमदार उपस्थिती या गाण्याचं खास आकर्षण ठरली आहे.
देविका दफ्तरदार भावस्पर्शी भूमिका असलेल्या “सहल” चित्रपटाचं पोस्टर लाँच!
या गाण्याच्या निमित्ताने जवळपास तीन दशकांहून अधिक काळाची मैत्रीही पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळत आहे. आलिम हकीम आणि बॉस्को मार्टिस यांनी तब्बल तीन दशकांनंतर एकत्र काम केलं असून, ‘पैसा फेक’मधून त्यांची क्रिएटिव्ह केमिस्ट्री तर दिसतेच, शिवाय वर्षानुवर्षांच्या मैत्रीतून निर्माण झालेला सहजपणा आणि आपलेपणाही जाणवतो.
दुष्काळ कधी जाहीर होणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिसूचनेबाबत मोठी घोषणा
‘पैसा फेक’ हे गाणं अनुराग रंगा यांनी गायलं असून, त्याचे आकर्षक शब्द मानव राज यांनी लिहिले आहेत. गाण्याचं दिग्दर्शन अनकन सेन यांनी केलं आहे. जोशपूर्ण संगीत, भन्नाट स्टाईल आणि दमदार सादरीकरणामुळे ‘पैसा फेक’ हे फुट-टॅपिंग गाणं संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.
