‘चिल्ड्रेन ऑफ ब्लड अँड बोन’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; टोमी अदेयेमींची गाजलेल्या कादंबरीला मोठ्या पडद्यावर
Children of Blood and Bone पॅरामाउंट पिक्चर्सने बहुप्रतीक्षित फँटसी चित्रपटाचा अधिकृत पहिला ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
Powerful trailer for ‘Children of Blood and Bone’ released Tomi Adeyemi’s acclaimed novel heads to big screen : पॅरामाउंट पिक्चर्सने बहुप्रतीक्षित फँटसी चित्रपट ‘Children of Blood and Bone’ चा अधिकृत पहिला ट्रेलर प्रदर्शित केला आहे. जगभर गाजलेल्या लेखिका टोमी अदेयेमी यांच्या बेस्टसेलर कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. नेत्रदीपक दृश्यरचना, थरारक अॅक्शन आणि भावनिक कथानकामुळे हा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
पर्यावरणीय मंजुरीशिवाय नवीन प्रकल्प नाही! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, काय आहेत अटी?
या चित्रपटाची कथा ओरिशा (Orïsha) या काल्पनिक राज्याभोवती फिरते. ज्या राज्यातून जादूची शक्ती हिरावून घेतली गेली आहे आणि जादूचा वापर करणाऱ्यांवर अमानुष अत्याचार केले जातात. अशा परिस्थितीत झेली (Zelie) ही तरुणी आपल्या लोकांमध्ये पुन्हा जादू परत आणण्यासाठी धोकादायक मोहिमेवर निघते.
या प्रवासात तिला काही अनपेक्षित साथीदार मिळतात. त्यांच्यासोबत ती शक्तिशाली शत्रूंना सामोरी जाते, अनेक वर्षांपासून दडलेली रहस्ये उलगडते आणि अखेर संपूर्ण ओरिशाचे भविष्य बदलू शकणाऱ्या आपल्या नियतीचा स्वीकार करते. ट्रेलरमध्ये भव्य काल्पनिक विश्व, रोमांचक युद्धदृश्ये आणि प्रभावी दृश्यवैभवाची झलक पाहायला मिळते.
AI नियंत्रणाबाहेर, ऑल्टमन यांची कबुली; 11000 एक्सपर्टचं मदतीसाठी ट्रम्प यांना साकडं
चित्रपटात ओरिशाच्या राज्यावर अत्याचारी राजवट असताना झेली आणि तिचा भाऊ राजाच्या मुलगा आणि मुलीसोबत हातमिळवणी करून अन्यायाविरुद्ध लढा उभारतात. जादूचे पुनरागमन घडवून आणण्यासाठीचा त्यांचा संघर्ष ही या चित्रपटाची मध्यवर्ती कथा आहे. जिना प्रिन्स-बायथवूड यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात थुसो म्बेडू, डॅमसन इद्रिस, अमांडला स्टेनबर्ग, टोसिन कोल, सिंथिया एरिवो, लशाना लिंच, झॅकरी मोमोह, रिचर्ड मोफे-डामिजो, चिवेटेल एजिओफोर, रेजिना किंग, इद्रिस एल्बा आणि व्हायोला डेव्हिस यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.
Maratha Reservaiton : 29 ऑगस्टपासून शेवटचं निर्णायक आंदोलन…मनोज जरांगे यांचा सरकारला अल्टिमेटम!
पॅरामाउंट पिक्चर्स हा भव्य फँटसीपट जानेवारी २०२७ मध्ये भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या फँटसी चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.