Download App

Aamhi Jarange चित्रपटाचा सेन्सॉर बोर्डशी संघर्ष; दिग्दर्शक म्हणतात समाज सिनेमाच्या पाठीशी…

Aamhi Jarange हा सिनेमा सेसॉर बोर्डच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.

Aamhi Jarange marathi film struggle with Sensor Board : गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित (Maratha Reservation) “आम्ही जरांगे” हा सिनेमा सेन्सॉर बोर्डच्या (Sensor Board) कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.

सुजय विखेंना पराभव अमान्य : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका; लाखो रुपये भरुन करणार चौकशी

त्या दरम्यान चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये ते म्हणाले आहेत की, मराठा आरक्षणाच्या संघर्षाचा धगधगता इतिहास जगापुढे मांडण्यासाठी ‘ आम्ही जरांगे ‘ सिनेमा सेन्सॉर बोर्डसोबत संघर्ष करत आहे. पण मराठा समाज हा आपल्या सोबत आहे. लवकरच येत आहोत नव्या तारखेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!

शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला : अजितदादांच्या विरोधात तगडी फाईट

तसेच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आपल्याच हक्कांसाठी मराठा समाजाच्या न्याय अधिकाऱ्यांसाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना संघर्ष करावा लागतोय. याच आंदोलनाच्या संघर्षाचा धगधगता इतिहास जगापुढे मांडण्यासाठी आज सेन्सॉर बोर्डसोबत आपल्या आम्ही जरांगे या सिनेमालाही संघर्ष करावा लागत आहे. पण एक लक्षात घ्या संघर्ष जरी असला तरी विजय हा नेहमी सत्याचा आणि चांगल्याचा होतो. आमचा हेतू हा इतिहास आणि संघर्ष जगापुढे आणणे हा आहे आणि तो नक्की पूर्ण होईल. ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्यापाठी संपूर्ण समाज ढाल बनून उभा राहिला आहे. तसाच तो या सिनेमाच्याही पाठीशी उभा राहील अशी खात्री आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

मोठी बातमी : वाढीव आरक्षण ठरलं गाजराची पुंगी; नितीश सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने गुंडाळला

या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारताय. तसेच अभिनेता प्रसाद ओक’ने अण्णासाहेब जावळे पाटील ह्यांची भूमिका साकारली आहे. इतकच नव्हे तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारताय. सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही महत्वाची भूमिका साकारत आहेत.

नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित या चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. या जबरदस्त क्रांतिकारी चित्रपटाची कथा – पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून, या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत.

follow us

वेब स्टोरीज