Gadar 2 ला सेन्सॉर बोर्डने लावली कात्री; ‘या’ सीन्समध्ये करण्यात आले बदल
Gadar 2 : सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर 2’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ चा ट्रेलर मोठ्या धडाक्यात रिलीज झाला. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर चित्रपट ‘गदर 2’ ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षाकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. मात्र आता यामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे ती म्हणजे ‘गदर 2’ मधील काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डने कात्री लावली आहे. त्यामुळे या चित्रपटातील काही सीन्स बदलण्यात येणार आहे. (Sunny Deol Amisha Patel Gadar 2 seens cut by Sensor Board )
या सीन्सला लावली कात्री…
सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर 2’ चित्रपटातील काही सीन्स बदलण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने दिल्या आहेत.यामध्ये चित्रपटातील दंगलीच्या सीनमध्ये दंगल खोरांनी दिलेल्या हर हर महादेवच्या घोषणा काढून टाकण्यात आल्या आहेत. त्या आता सबटायटलमध्येही दिसणार नाहीत.
कर्जत MIDC वादात नवा ट्विस्ट! रोहित पवारांनी टाळलं राजकीय क्रेडिट; शिंदेंनाही सुनावलं
त्याचबरोबर तिरंगा या शब्दाऐवजी सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना झंडे शब्द वारण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘हर झंडे को… में रंग देंगे’ असा डायलॉग असणार आहे. तर चित्रपटातील ठूमरीमध्ये ‘बता दे सखी.. गये शाम…’ च्या ऐवजी आताा ‘बता दे पिया कहां बिताई शाम…’ असे असणार आहेत. तसेच गीता आणि कुराण बद्दलच्या डायलॉगमध्ये ‘दोनों एक ही तो हैं, बाबा नानक जी ने भी यही कहा है’ ऐवजी’एक नूर ते सब उपाजे, बाबा नानक जी ने भी यही कहा है’ असा बदल करण्यात आला आहे.
पुढे हिंसा चार आणि रक्तपाताच्या दृष्यांच्या ठिकाणी असलेले शिव तांडवमधील श्लोक आणि शिव मंत्राचा जप बदलण्यात आला असून तेथे बॅकग्राऊंडम्युझिक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर चित्रपटात वापरलेल्या सर्व श्लोक आमि मंत्रांच्या प्रति तसेच चित्रपटात दाखवलेल्या सर्व 1971 च्या भारत पाक युद्धाचे कागदपत्री पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तर बस्टर्ड शब्दा ऐवजी इडियट आणि डिस्क्लेमर बदलण्यास सांगितले आहे.
दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट आहेत.