देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न जीवघेणं झालंय; समृद्धी महामार्ग बंद करा! काँग्रेसची विधानसभेत आक्रमक मागणी

देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न जीवघेणं झालंय; समृद्धी महामार्ग बंद करा! काँग्रेसची विधानसभेत आक्रमक मागणी

मुंबई : शहापूरजवळील सरलांबे येथे समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना ब्रीज गर्डरला जॉईन करणारी क्रेन खाली पडल्याने मोठा अपघात घडला. 1 ऑगस्टच्या रात्री या भीषण अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सरकारकडून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या अपघाताच्या घटनेचे पडसाद आज (2 ऑगस्ट) राज्याच्या विधानसभेतही पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आता जीवघेणे झाले आहे, असे म्हणत विधानसभेचे नामनिर्देशित विरोधी पक्षनेते विजय वडेट्टावर यांनी उपाययोजना होईपर्यंत समृद्धी महामार्ग अशी मागणी मागणी केली. (Leader of Opposition Vijay Vadettivar’s demand to close the Samriddhi Highway after the horrific accident)

काय घडलं विधानसभेत?

विधानसभेत समृद्धी महामार्गावर घडलेल्या अपघाताबाबत चर्चा सुरु होती. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या महामार्गावचे घाईने काम करा, तातडीने काम करा असा आदेश आहेत. त्यामुळे इथे निरपराध 20 मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर 100 दिवसांमध्ये 900 जण दगावले आहेत. या मृत्यूच्या तांडवाला जबाबदार कोण? राज्यातील नागरिकांचा जीव घेऊन समृद्धी होत असेल तर यावर शासनाने उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी केली. आता जी घटना घडली त्याला जबाबदार कोण? शासन की प्रशासन जबाबदार आहे हे सरकारने सांगायला हवे. तसेच यापुढे अशा घटना घडू नये यासाठी सरकार काय उपाययोजना करणार त्याचे उत्तर दिले पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.

Video : फडणवीसांकडून ‘शिदोरी’ चा संदर्भ; संभाजी भिंडेवरून विधानसभेत घमासान

तर विजय वडेट्टीवार म्हणाले, ही समृद्धी आता जीवघेणी झाली आहे. जवळपास 90 टक्के ट्रॅव्हल्सनी त्यांचा मार्ग बदलला आहे. हा महामार्ग म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते. पण आता हे स्वप्न जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे हा महामार्ग काहीकाळासाठी बंद केला पाहिजे. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. दर 150 – 200 किलोमीटरवर फुडप्लाझा, मार्केट अशा गोष्टी असायला हव्यात. अॅम्बुलन्स, क्युआरव्ही अशा सुविधा पाहिजेत. पण अद्याप कोणतीही व्यवस्था नाही.

कर्जत MIDC वादात नवा ट्विस्ट! रोहित पवारांनी टाळलं राजकीय क्रेडिट; शिंदेंनाही सुनावलं

पंतप्रधानांच्या हस्ते महामार्गाचे उद्धाटन केले, पण आता बदल करू शकता. 20 लोकांचा जीव जातो, याबाबत सरकार संवेदनशील आहे की नाही? या मृत्यूला जबाबदार कोण? या रस्ता बांधकामात काही त्रुटी आहेत का? हे शोधायला हवे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे ऑडिट करून घ्या आणि ज्या काही त्रुटी असतील त्या समोर आल्या पाहिजे. तोवर समृद्धी महामार्ग बंद करावा, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube