मुस्लिम, दलित, ख्रिश्चन आणि मराठा समाज मला मतदान करणार; फारुख इनामदार स्पष्टच म्हणाले

Pune Municipal Corporation Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून

Farooq Sheikh

Pune Municipal Corporation Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरु असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे पुणे महापालिका निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक 41 ची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून फारुख इनामदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. फारुख शेख यांनी लेट्सअप मराठीच्या लेट्सअप विशेष या कार्यक्रमात बोलताना प्रभाग क्रमांक 41 साठी विकासाचे व्हिजन मांडले आहे.

लेट्सअप मराठीशी (Letsupp Marathi) बोलताना फारुख इनामदार (Farooq Inamdar) म्हणाले की, प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंड्री हा प्रभाग हडपसरचा काही भाग आहे. या प्रभागामध्ये हडपसरचा सर्वे नंबर 75, 74, 73, 45, 302, 68, 69, 71, 72 आहे. तर काळे पडळचा सर्वे नंबर 49 50 53 असा भाग या प्रभागात आहे. हा भाग पुणे महापालिकामध्ये 1997 साली आला आहे. मात्र या भागात पुणे महापालिकाच अजिबात काहीच काम झालेलं नाही. या प्रभागात पाण्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे. ड्रेनेजची समस्या आहे. पण आमचे नेते अजित पवार (Ajit Pawar) पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्याचबरोबर या हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी या प्रभागासाठी भरपूर फंड दिला आहे. त्यामुळे आम्ही या भागात विकास कामे करत आहोत.

आमचा नगरसेवक नसताना देखील या आमचा ह्या भागात फार मोठं प्रभुत्व आहे. त्यामुळे या प्रभागात मला मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज, दलित समाज , मराठा समाज आणि सर्व समाजातील लोक मला मतदान करणार असा विश्वास मला आहे असं या कार्यक्रमात बोलताना प्रभाग क्रमांक 41 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख इनामदार म्हणाले.

Agniveers New Rules : अग्निवीरांसाठी नवीन नियम! पर्मनंट सैनिक होण्यापूर्वी करता येणार नाही लग्न

तसेच मी गेल्या 40 वर्षांपासून समाजकारण करत आहे. 1979 पासून मी समाजकारण करत आहे. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो. त्यांनी आम्हाला कामाची शिकवण दिली आहे. त्या काळात या भागाचे आमदार विठ्ठलराव तुपे पाटील होते. त्यांची कामाची पद्धत आम्ही पाहिलेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीने काम केले या शिकवणीतून आम्ही काम करीत असल्याने आम्हाला लोक मतदान करतील असा आम्हाला विश्वास आहे असं देखील फारुख इनामदार म्हणाले.

follow us