Suresh Kalmadi Passed Away : मोठी बातमी; माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन
Suresh Kalmadi Passed Away : माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज निधन झाले असून ते 82 वर्षांचे होते.
Suresh Kalmadi Passed Away : माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज निधन झाले असून ते 82 वर्षांचे होते. काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुरेश कलमाडी गेल्या काही दिवसांपासून आजरपणाशी झुंज देज होते मात्र आज पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार, आज दुपारी 2 पर्यंत सुरेश कलमाडी यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
पुण्याच्या राजकारणात अनेक वर्ष सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता मात्र राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळ्यात (Commonwealth Games Scam) त्यांचे नाव आल्याने त्यांची राजकीय कारकीर्द डागाळली होती. 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळ्यात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते मात्र 2025 मध्ये या प्रकरणात आलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती.
कोण होते सुरेश कलमाडी
1 मे 1944 रोजी जमलेल्या सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi Passed Away) भारतीय वायुसेनेचे माजी वैमानिक होते. यानंतर त्यांनी राजकारणात एन्ट्री केली आणि पुण्याच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती मात्र दिल्ली येथे 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात त्यांचा नाव आल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई होती.
Pune, Maharashtra | Former Union Minister and Senior Congress leader Suresh Kalmadi passed away after a prolonged illness. He was admitted in Deenanath Mangeshkar hospital in Pune. His mortal remains will be kept at Kalmadi House, Erandwane, Pune till 2 pm and cremation will take…
— ANI (@ANI) January 6, 2026
आज वाद टाळा नाहीतर…, जाणून घ्या ‘या’ राशींसाठी कसा राहणार दिवस
या प्रकरणात 2025 मध्ये आलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती. या क्लीन चिटनंतर ते पुन्हा राजकारणात कमबॅक करणार असल्याची चर्चा होती मात्र आजारपणामुळे ते राजकारणापासून दुर राहिले.
त्यांनी पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1960 साली त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर 1964 मध्ये हवाई दलाच्या प्रशिक्षणासाठी ते जोधपूर येथील फ्लाइंग कॉलेजमध्ये दाखल झाले. 1954 ते 1972 या कालावधीत त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली.
राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत 1978 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. अवघ्या 38 व्या वर्षी, 1982 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकत खासदार म्हणून प्रवेश केला. त्यानंतर जवळपास तीन दशके त्यांनी संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली.
‘पुणे म्हणजे कलमाडी’ असा काळ
एक काळ असा होता की पुणे आणि कलमाडी हे समीकरण सर्वश्रुत होते. पुणे महापालिकेवर कलमाडी गटाचे वर्चस्व होते. कर्वे रोडलगत असलेले दोन मजली ‘कलमाडी हाऊस’ हेच सत्ताकेंद्र मानले जायचे. महत्त्वाचे निर्णय तिथूनच होत असल्याची चर्चा होती. कार्यकर्त्यांची तिथे कायम गर्दी असायची.
कलमाडी पुण्यात येताच विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमायची. आपल्या झुलत्या खुर्चीत बसून ते राजकीय सूत्रे हलवायचे, पदांचे वाटप व्हायचे, अशी ती वेळ होती. त्यांनी सुरू केलेला पुणे फेस्टिव्हल हा शहरातील सांस्कृतिक आयुष्यातील मोठा सोहळा मानला जात असे. या महोत्सवात हेमा मालिनी, अमरीश पुरी, गुरुदास मान, जगजित सिंग यांसारखे अनेक नामवंत कलाकार सहभागी झाले होते.
