Suhani Bhatnagar Passes Away : ‘दंगल’ चित्रपटात (Dangal Movie) बबिता फोगाटची (Babita Phogat) बालपणीची भूमिका साकारणाऱ्या सुहानी भटनागरचे (Suhani Bhatnagar) निधन झालंय. मृत्युसमयी सुहानी केवळ १९ वर्षांची होती. तिच्या अशा निधनाने आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. दंगल सिनेमानंतर सुहानी फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होती आणि सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती.
भाजपकडून नगर दक्षिण लोकसभेचे तिकीट कोणाला? विखेंनी स्पष्टच बोलून दाखवलं
‘दंगल’मध्ये सुहानी आमिर खानची मुलगी बबिताच्या भूमिकेत दिसली होती. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. सुहानीने उपचारासाठी घेतलेल्या औषधांचा दुष्परिणाम असा झाला की तिच्या शरीरारत हळूहळू पाणी साचले. तिला दिल्लीतील एम्समध्ये रुग्णालयात बराच काळ दाखल करण्यात आले होते. पण तिच्यावर औषधांपचांचा काहीही उपयोग झाला नाही, अखेर तिने जगाचा निरोप घेतला. सुहानीच्या पार्थिवावर आज फरीदाबादच्या सेक्टर-15 येथील अजरौंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Jiya Shankar : जिया शंकरच्या किलर स्माईलची चाहत्यांना भुरळ!
दरम्यान, सुहानी भटनागर ही बॉलिवूडची प्रसिद्ध बालकलाकार होती. ती आमिर खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट दंगल (2016) मधील बबिता फोगटच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. अनेक टेलिव्हिजन जाहिरातींमध्येही ती दिसली होती.
दंगल सिनेमातील अभिनयाचं कौतुक झाल्यावर सुहानीला अनेक सुहानीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. मात्र तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. तिला तिच्या अभ्यासात लक्ष द्यायचे होते. सुहानी 25 नोव्हेंबर 2021 पासून तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर निष्क्रिय होती. मात्र, याआधीही तिने अनेकदा तिचे फोटो शेअर केले आहेत.