Ira Khan Pre Wedding Pics: बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खानने (Ira Khan) 3 जानेवारी रोजी नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhar) नोंदणीकृत विवाह केल्यानंतर 10 जानेवारी रोजी उदयपूरमधील अरवली हिल हॉटेलमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार विवाह केला आहे. लग्नानंतर 13 जानेवारीला आमिर खानने आयरा आणि नुपूरसाठी ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते.
यामध्ये हारुख खान, सलमान खान, हेमा मालिनी, रेखा, सायरा बानो, माधुरी दीक्षित, जुही चावला, कतरिना कैफ, रणबीर कपूरसह अनेक सेलेब्स उपस्थित होते. आयराच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहेत. आता अलीकडेच आयराने तिच्या प्री-वेडिंग फंक्शनची झलक दाखवली आहे. यामध्ये ती पती नुपूर शिखरे, कुटुंब आणि मित्रांसोबत दिसत आहे.
या फोटोंमध्ये एक फोटो देखील आहे, यामुळे आयरा खानला चाहत्यांनी खडेबोल सुनावले आहे. आयराने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती सिगारेट ओढताना दिसत आहे, यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड सुरु आहे.
सिगारेट ओढल्याने आयरा खान ट्रोल झाली: आयरा खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एकत्र अनेक फोटो शेअर केले आहे, यामध्ये आयरा एका मैत्रिणीसोबत झोपलेली आणि डोळ्यांवर झाकलेली दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये आयराने तिची आई रीना दत्तासोबत पोज दिली आणि पती नुपूर शिखरेसोबत मस्ती करताना दिसली. यातील एक सिगारेटसोबतचे आयराचे फोटो देखील आहे. त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.
ऑस्कर नामांकित दिग्दर्शक शेखर कपूरचा सिनेमॅटिक प्रवासच डिजीमॉन हौनसौनं केलं तोंडभरून कौतुक
आयरा खानच्या फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘तुमच्या चांगल्या सवयींसाठी लोक तुम्हाला फॉलो करतात आणि तुम्हीच तुमची इमेज खराब करत आहात.’ एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही इस्लाम सोडला आहे आणि तुम्ही धर्मगुरू बनला आहात हे तुम्ही देवाला दाखवाल का? काफिर?” होय.’ तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की, तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे. एका यूजरने लिहिले की, ‘आमिर खानची मुलगी असल्याने ती असे फोटो शेअर करून सिगारेटचा प्रचार करत आहे, अशा तिखट शब्दात अभिनेत्रीला चाहत्यांनी खडेबोल सुनावले आहे.