Download App

तुटलेले दात, चेहऱ्यावर चिखल; आमिरचा आगामी सिनेमातला लूक पाहिलात का? डोळ्यांवर विश्वास नाही बसणार

Aamir Khan New Look: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) ‘तारे जमीन पर’ (Taare Zameen Par) हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box office) जबरदस्त हिट ठरला. या सिनेमातून दर्शील सफारीची बॉलिवूडमध्ये ओळख झाली. तब्बल 16 वर्षांनंतर आमिर आणि दर्शीलची जोडी पुन्हा आपली जादू दाखवणार आहेत. सोबतच दीड वर्ष अभिनयापासून दूर असलेला आमिर कदाचित अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन करताना दिसणार आहे.

आगामी प्रोजेक्टमधून आमिरचा नवा लूक: नुकताच दर्शील सफारीने आमिर खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच ‘तारे जमीन पर’मधील एका दृश्याचा फोटोही होता, ज्यामुळे आमिर खान आणि दर्शील सफारी ही जोडी 16 वर्षांनंतर चित्रपटाच्या पडद्यावर परतत असल्याची माहिती समोर आली. या फोटोंनंतर मंगळवारी दर्शीलने त्याच्या आगामी प्रोजेक्टमधील आमिरच्या नवीन लूकचे फोटो शेअर केले, यामध्ये तो खूपच बदललेला दिसत आहे की त्याला ओळखणे कठीण झाले.

एका फोटोमध्ये आमिर एका साधूच्या वेशात, हातात टॉर्च धरलेला दिसत आहे. अभिनेत्याने विचित्र हास्याचे हावभाव दिले आहेत. त्याचे दातांवर डाग पडले असून त्याचा चेहरा चिखलाने माखलेला पाहायला मिळत. दुसऱ्या फोटोमध्ये आमिर अंतराळवीराच्या भूमिकेत दिसत आहे.

कार्तिक आर्यनच्या ‘Aashiqui 3’ बाबत टी-सीरीजचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘अफवा बऱ्याच…’

दर्शील सफारीने शेअर केलेले फोटो हे त्याच्या कोणत्या चित्रपटातील आहेत किंवा कोणत्या जाहिरातीतील आहेत, याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहतेही खूपच उत्सुक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

‘तारे जमीन पर’चा सिक्वेल बनणार: आमिर खान 2008 मध्ये आलेल्या ‘तारे जमीं पर’ या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. ‘सीतारे जमीन पर’ असे या आगामी सिनेमाचे नाव आहे.

follow us

वेब स्टोरीज