Aaradhya Bachchan: बच्चन कुटुंबाने ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा, काय आहे नेमकं प्रकरण?

Aaradhya Bachchan: बॉलीवूड बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे कुटुंब बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वात गोंडस मुलगी म्हणजे आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan). आराध्या सतत कोणत्याना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. सध्या आराध्या एका प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आली आहे, तिने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे सध्या ती खूपच चर्चेचा विषय […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 20T102613.389

Aaradhya Bachchan

Aaradhya Bachchan: बॉलीवूड बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे कुटुंब बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वात गोंडस मुलगी म्हणजे आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan). आराध्या सतत कोणत्याना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते.

सध्या आराध्या एका प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आली आहे, तिने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे सध्या ती खूपच चर्चेचा विषय बनत आहे. युट्यूब चॅनलवर आराध्याच्या तब्येतीची चुकीची माहिती दिल्याच्या विरोधात आराध्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची नात आराध्या बच्चनने (Aaradhya Bachchan) उच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली होती.


या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणाविषयी बोलताना आराध्याने सांगितले आहे की, काही युट्यूब (Youtube) आणि वेबसाईटवरून आराध्याच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरवले जात होते. प्रकृतीबद्दल चुकीची आणो खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अशा युट्यूब चॅनेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तिने यावेळी केली होती. त्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

IT Raid : टी-सिरीजचे निर्माते विनोद भानुशालीसह अनेकांवर आयटीची छापेमारी

अनेकदा आराध्या ट्रोल करतात?

बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची नात आराध्या बच्चन ही ११ वर्षांची असून सोशल मीडियावर (Social Media) तिचा चांगलाच बोलबोला असतो. आराध्या ही बॉलीवूड स्टार किड्समध्ये सर्वात लोकप्रिय स्टार किड (star kid) मानली जाते. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबरोबरची (Aishwarya Rai Bachchan) तिची बाँडिंग खूपच स्पेशल आहे. ऐश्वर्या आराध्याला नेहमी सोबत घेऊन फिरत असल्याचे चाहत्यांना बघायला मिळतं. या कारणाने आराध्यावर अनेक वेळा ट्रोल केलं जाते.

 

Exit mobile version