Aayush and Anushka’s ‘Jabraat‘ pair from the small screen will be seen on the silver screen : छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही लोकप्रिय जोडी आता ‘जब्राट’ अशा रोमँटिक अंदाजात मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मालिकेनंतर ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार? याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं.
बांगलादेशातील हिंसाचाराचे पडसाद दिल्लीत; हिंदू संघटना आक्रमक, दूतावासाच्या कार्यालयाला घेराव
तारा करमणूक निर्मित, प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ या मराठी चित्रपटात प्रिन्स आणि निशा या व्यक्तिरेखेतून या दोघांची लव्हेबल केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. नवीन वर्षात येत्या ६ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शानदार पोस्टर आणि चित्रपटातली ‘तू आणि मी’ हे त्यांचे रोमँटिक गाणंही प्रदर्शित झालं आहे.
काल शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा अन् आज भाजपमध्ये प्रवेश, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का
‘लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स’ असा मनोरंजनाचा जबरदस्त मसाला असणाऱ्या ‘जब्राट’ या संगीतमय चित्रपटात कॉलेज विश्वातल्या दुनियादारीच्या अत्यंत वेगळ्या पण तितक्याच भावस्पर्शी गोष्टी पहायला मिळणार आहे. आयुष संजीव, अनुष्का सरकटे या जोडीसोबत वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे,विक्रम आल्हाट, प्रगती कोळगे यांसोबत संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर, गणेश यादव ही ज्येष्ठ कलाकार मंडळी दिसणार आहेत.
‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील आहेत तर वेशभूषा युगेशा ओमकार यांची आहे. संगीताची जबाबदारी डॉ. जयभीम शिंदे यांची आहे. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.
