निशा मधुलिकाचे छोट्या पडद्यावर पदार्पण! ‘स्टार प्लस’ वर पाककृतींसोबत उलगडणार हृदयस्पर्शी कथा!

Nisha Madhulika’s debut on the small screen! A heartwarming story will unfold with recipes on ‘Star Plus’ : देशाच्या कानाकोपऱ्यातील घराघरांत ‘स्टार प्लस’ने नेहमीच केंद्रस्थान प्राप्त केले आहे. एकाहून एक सरस नाट्यानुभवांपासून प्रेरणादायी प्रवासांपर्यंत प्रत्येक पिढीला आपलेसे वाटणारे कथानाट्य या मनोरंजन वाहिनीवर पेश केले जाते. हाच वारसा पुढे नेत, या वाहिनीवर प्रेक्षकांना नवा आस्वाद घेता येईल, असा एक नवा कार्यक्रम लवकरच सादर होणार आहे.
पुण्यात विविहितेंच्या आत्महत्येचे सत्र सुरूच; सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेने केले विषप्राशन
प्रसिद्ध यू ट्यूबर आणि आपल्या पदार्थांनी घरगुती स्वयंपाकाच्या बाबतीत एक नवी हलचल निर्माण करणाऱ्या निशा मधुलिका ‘स्टार प्लस’द्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत! त्यांचा लाघवी स्वभाव, वागण्या-बोलण्यातील नम्रता, सोप्या पाककृती आणि प्रेक्षकांना आपलेसे करण्याची त्यांची वृत्ती याकरता नावजलेल्या निशा मधुलिका यांनी यू ट्यूबवर १ कोटी २० लाखांहून अधिक सदस्यांचा एक निष्ठावंत समुदाय निर्माण केला आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून महाराष्ट्रात दाखल, तब्बल १२ दिवस आधीच ‘कोसळधारा’
शाकाहारी पाककृतींचा एकेक टप्पा निगुतीने आणि अत्यंत सोप्या पद्धतीने सांगण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे निशा मधुलिका आजच्या घडीला देशातील सर्वात आवडत्या पाककृती विषेशज्ञ बनल्या आहेत. प्रामुख्याने, गृहिणी आणि खाद्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद त्यांना लाभत आहे. आता त्यांची जादू छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे- ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय पात्रांसह ‘स्टार प्लस’च्या मालिकांमध्ये त्या आता सहभागी होत आहेत.
‘स्टार प्लस’ वाहिनीने अलीकडेच प्रदर्शित केलेल्या प्रोमोमधून प्रेक्षकांना जणू आगामी कार्यक्रमाची चवदार झलक मिळते. आपण निशा मधुलिका यांना घरात स्वयंपाक बनवताना पाहू. त्या केवळ पाककृती बनवताना दिसतील, असे नव्हे तर अत्यंत लाघवीपणे आठवणींना उजाळा देताना दिसतील आणि त्यांच्या खास शैलीत जीवनाचे धडेदेखील उलगडताना पाहायला मिळतील. त्यांची उपस्थिती ‘स्टार प्लस’च्या जगतात बेमालूमपणे मिसळून गेली आहे. त्या ‘स्टार प्लस’ वाहिनीच्या मालिकांमधल्या लोकप्रिय पात्रांसोबत स्वयंपाक बनवताना दिसतील. प्रेक्षकांना नाट्य, भावना आणि पदार्थांची एक अफलातून चव चाखता येईल. मोहक वृत्ती आणि छोट्या पडद्यावरील कथाकथनाचा हा रोमांचक मेळ प्रेक्षकांना एक नवी अनुभूती देईल.