सुपरहिट गाण्याच सुपरहिट फ्युजन घेऊन अभिजीत सावंत प्रेक्षकांच्या भेटीला !

Abhijeet Sawant :  संगीत विश्वातली 20 वर्ष साजरी करत असताना अभिजीत (Abhijeet Sawant) एका मागोमाग एक प्रेक्षकांना सुखद धक्के देताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी ” चाल तुरु तुरु ” सारख्या जुन्या गाण्याची नवी मैफिल जमवत त्याने प्रेक्षकांना मोहित केलं आणि आता तो पुन्हा प्रेक्षकांना नव्या गाण्याचं खास सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाला आहे. इंडियन आयडॉल (Indian Idol) […]

Abhijeet Sawant

Abhijeet Sawant

Abhijeet Sawant :  संगीत विश्वातली 20 वर्ष साजरी करत असताना अभिजीत (Abhijeet Sawant) एका मागोमाग एक प्रेक्षकांना सुखद धक्के देताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी ” चाल तुरु तुरु ” सारख्या जुन्या गाण्याची नवी मैफिल जमवत त्याने प्रेक्षकांना मोहित केलं आणि आता तो पुन्हा प्रेक्षकांना नव्या गाण्याचं खास सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाला आहे.

इंडियन आयडॉल (Indian Idol) पासून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचून अभिजीतने सगळ्यांची मन जिंकली आणि तेव्हापासून सुरू झालेला हा संगतिक प्रवास आजही तितकाच अविरत पणे सुरू आहे. अभिजीतने आजवर अनेक कमालीची गाणी केली आहेत. अश्यातच तरुणाई पासून अगदी लहानग्या पर्यंत त्याचा गाण्याची आवड सगळ्यांना आहे.

आता अभिजीत काय नवीन घेऊन येणार आहे या बद्दल चर्चा असताना त्याने काही नव्या लूक्सचे फोटो सोशल मीडिया वर शेयर केले होते आणि आता या फोटो मागचं खरं कारण समोर आलं आहे. नवीन ढंगातील ‘चाल तुरु तुरु’च्या यशानंतर आता अभिजीत नव्या सुरात प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याचा मोहक आवाजानं लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं.

अभिजीत सावंत यानं अनेक वेगवेगळे संगीतमय प्रोजेक्ट्स केले आणि अजूनही तो नवनवीन प्रयोग करत आहे. ‘पैसा थेंब थेंब गळं’ हे खास गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून पुन्हा त्याच्या आवाजाची जादू प्रेक्षकांनी अनुभवयाला मिळणार आहे.

अभिजीत या नव्या गाण्याबद्दल सांगताना सांगतो ” पैसा थेंब थेंब गळं ” हे नवं गाणं प्रेक्षकांना नक्कीच प्रेक्षकांना आवडेल आणि हे गाणं सुद्धा एक फ्युजन साँग आहे. दादा कोंडके यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीचं  सुपरहिट गाणं असलेल्या ” ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं” या गाण्याचा हे खास फ्युजन आहे. गाण्यामधला वेगळेपणा जपून त्यांना थोडा मॉर्डन तडका देऊन आम्ही हे गाणं केलं आहे.

विमानात सर्वात सुरक्षित सीट कोणती? कसं केलं जातं रेस्क्यू; जाणून घ्या सर्वकाही

थोडं रॅप थोडं जुन असा काहीसा अंदाज असलेलं हे नवं गाणं देखील ट्रेंड होईल अशी आशा आहे” अभिजीतची आजवर अनेक गाणी ट्रेंड झाली प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ठरली आता नवीन गाणं किती धुमाकूळ घालणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Exit mobile version