गायक अभिजित सावंतसाठी 2025 हे वर्ष ठरलं खास; गौतमी पाटील सोबतच्या सदाबहार गाण्यामुळे राहिला चर्चेत

सदाबहार गाण्याने प्रेक्षकांना मोहित करणारा लाडका अभिजीत 2025 वर्षात पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकून गेला.

Untitled Design   2025 12 29T133631.565

Untitled Design 2025 12 29T133631.565

Abhijit Sawant is in the news this year : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं जंगी स्वागत करत असताना हे वर्ष अनेक कलाकारांसाठी लक्षवेधी ठरताना बघायला मिळालं मग ते नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये उत्तम काम करणं असू देत किंवा इंडस्ट्री मधल्या अनपेक्षित लोकांसोबत नवीन काम करणं, आणि अश्यातच हे संगीत विश्वात(Music Industry) एक नाव चर्चेत राहील ते म्हणजे गायक अभिजीत सावंत!(Abhijeet Sawant) सदाबहार गाण्याने प्रेक्षकांना मोहित करणारा लाडका अभिजीत 2025 वर्षात पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकून गेला. पण खास करून त्याने आताच्या जेन झी जनरेशनला एका OG गाण्याचं नवं कोर व्हर्जन गिफ्ट दिलं अस म्हणणं वावगं ठरणार नाही.

2025 हे वर्ष अभिजीत साठी नावीन्यपूर्ण कामाच्या संधी देणार होतं. सोबतीला त्याच्यासाठी वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स घेऊन आलं, त्याच्या सुमधुर गाण्याची जादू आणि एवढंच नाही तर गाण्यामध्ये त्याने केलेला अभिनय या निमित्तानं प्रेक्षकांनी अनुभवला. सांगतिक विश्वात 20 वर्ष पूर्ण करून 2025 वर्ष त्याने उत्तम प्रोजेक्ट्सने खास केलं आहे. इंडियन आयडॉल पासून सुरु झालेला प्रवास पुढे अनेक रियालिटी शो पर्यंत येऊन पोहचला आणि 2025 या वर्षात केलेल्या सेलिब्रिटी मास्टर शेफ मधून त्याने पुन्हा एकदा नामवंत शेफ सोबत प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. गाणं आणि खाणं या दोन्ही गोष्टींचा समतोल साधून या वर्षात अनेक ब्लॉकबस्टर गाणी देखील केली.

पुणे मनपासाठी भाजपचे प्रभाग क्रमांक 25 चे उमेदवार निश्चित; 100 जणांची संभाव्य यादी समोर…

बॉलिवूडच्या सगळ्यात बड्या संगीत फेस्टिवल असलेल्या “बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट” मध्ये अभिजीतने मराठी गाणं गाऊन हिंदी रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली आणि अजय – अतुल या गायक जोडी नंतर या बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट मध्ये गाण्याचा मान अभिजीतने पटकावला ! जुन्या आयकॉनिक गाण्यांना मॉर्डन ट्विस्ट देत आय पॉपस्टार सारख्या मंचावर किंग सोबत जेन झी साठी “मोहब्बते लुटाऊंगा” हे त्याचं गाणं त्याने नव्या ढंगात सादर केलं आणि आताच्या पिढीने ते ट्रेंड सुद्धा केलं. मोहब्बते लुटाऊंगाच्या नव्या व्हर्जनने फक्त जेनझी नाही तर मिलेनियर्सला सुद्धा जुन्या गाण्याची नवी बाजू पसंतीस पडली.

“तुझी चाल तुरु तुरु” ” ढगाला लागली कळ” ते “रुपेरी वाळूत ” सारख्या जुन्या गाण्यांना एक नवा हटके ट्विस्ट देत अभिजीतच्या आवाजाने ही जुनी सदाबहार गाणी रसिक प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य गाजवून गेली. 2025 मध्ये अभिजीतने आयकॉनिक गाणी रि क्रिएट करून त्यातली मज्जा पुन्हा एकदा रसिकांना दाखवून दिली आणि आजची पिढी या गाण्यावर ट्रेंड करायला लागली. एकंदरीत वर्षाची सांगता त्याने अजून एका मोठ्या अनपेक्षित कोलॅबने केली आणि नृत्यांगना गौतमी पाटील सोबत तो “रुपेरी वाळूत” धमाकेदार गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पुन्हा एकदा चर्चेत आला. ट्रेंडी गाणी असो किंवा गाण्यामधला त्याचा अभिनय सगळ्याच गोष्टी खूप लक्षवेधी ठरल्या. नव्या वर्षात अभिजीत मराठी सोबतीने हिंदी इंडस्ट्रीत सुद्धा नवनवीन गाणी करणार का? हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे.

Exit mobile version