Download App

Aishwarya Divorce :ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांना अभिषेक बच्चनचा पूर्णविराम! चाहत्यांनाही धक्का

Aishwarya Rai Abhishek Bachchan : गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत.

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Post: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्यातील मतभेदाच्या चर्चा (Divorce ) बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. या कपलचा घटस्फोट होत असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, दोघांनीही याबद्दल कधीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या (Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce ) चर्चा खूपच होत आहेत. नुकतचं ते दोघे अनंत आणि राधिकाच्या लग्नात वेगळे आले होते आणि त्यांनी एकही फोटो एकत्र काढला नाही. लग्नाचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन मुलगी आराध्या बच्चन आणि पत्नी ऐश्वर्यासोबत दिसत होती. या सगळ्यामध्ये अभिषेक बच्चनच्या एका पोस्टला पसंती दिल्याची चर्चा रंगली आहे.


घटस्फोटाची पोस्ट

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चाच्या दरम्यान, अभिषेक बच्चनने नुकतचं सोशल मीडियावर एक पोस्ट लाईक केली होती. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अभिषेकने लाईक केलेल्या पोस्टमध्ये घटस्फोटाच्या अडचणी आणि ‘ग्रे घटस्फोट’च्या वाढत्या ट्रेंडवर चर्चा करण्यात आली होती. लेखिका हीना खंडेलवाल यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे, “जेव्हा प्रेम सोपे होणे थांबते. लग्न झालेले जोडपे आता वेगळे होत आहेत. त्यांना हा निर्णय घेण्यास कशामुळे भाग पाडले आणि ग्रे घटस्फोट का वाढत आहेत?

पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “घटस्फोट घेणे कोणासाठीही सोपे नाही. आनंदाने जगण्याचे स्वप्न कोण पाहत नाही किंवा रस्ता ओलांडताना वृद्ध जोडप्यांचे हात धरून ते हृदयस्पर्शी व्हिडिओ पुन्हा बनवण्याची कल्पना कोण करत नाही? तरीही, कधी कधी जीवनात आपण विचार करतो तसे नसतं. पण जेव्हा लोक त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग छोट्या-मोठ्या दोन्ही गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असतात, बऱ्याच काळानंतर एकत्र राहिल्यानंतर ते कपल वेगळे होतात, ते कसे हाताळतात? त्यांना नाते तोडण्यास कशामुळे प्रवृत्त होते आणि त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? या प्रश्नांवर ही कथा प्रकाश टाकते. योगायोगाने, जागतिक स्तरावर ‘ग्रे घटस्फोट’ किंवा ‘सिल्व्हर स्प्लिटर’ वाढत आहेत. ग्रे घटस्फोट म्हणजे जेव्हा विवाहित जोडपे वेगळे होण्याचा निर्णय घेतात, साधारणपणे 50 वर्षांच्या नंतर. त्याची कारणे देखील भिन्न असतात.

Aishwarya Rai Birthday : मॉडेलिंगपासून करिअरला सुरूवात केली, आज करोडोंची मालकीन झाली

पोस्टला लाईक करतानाचा स्क्रीनशॉट व्हायरल

अभिषेक बच्चन हा अशा अनेक लोकांपैकी एक आहे ज्यांनी ही पोस्ट ‘लाइक’ केली आहे. मात्र, अभिनेत्याच्या या हालचालीमुळे अनेक यूजर्सच्या भुवया उंचावल्या आहेत. आता याचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अभिषेक-ऐश्वर्या रायचे नाते आता बिघडले आहे असा अंदाज अनेकांनी लावला, तर काहींनी अभिषेकचा बचाव केला आणि म्हटले की हे ‘सामान्य’ असू शकते आणि ऐश्वर्या -अभिषेकच्या नात्याशी संबंधित नाही, असं मत देखील काहींनी मांडलं आहे.

follow us