एआय व्हिडिओंवर ‘स्टॉप’! अभिषेक-ऐश्वर्या राय न्यायालयात, 4 कोटी भरपाईची मागणी

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडिओंच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

_Abhishek Bachchan Aishwarya Rai Bachchan

Abhishek Aishwarya Petition Against AI Generated Deepfake Videos : मुंबईचे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडिओंच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी या प्रकरणात सुमारे ₹4 कोटी (अंदाजे $40 दशलक्ष) भरपाईची मागणी केली आहे.

बेकायदेशीर वापर

जोडप्याने न्यायालयात दिलेल्या याचिकेत सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर त्यांच्या चेहरा, आवाज, (Abhishek Bachchan) प्रतिमा आणि व्यक्तिमत्त्वाचा बेकायदेशीर वापर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्याची मागणी केली (Aishwarya Rai Bachchan) आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 6 सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या या याचिकेत जवळपास 1,500 पानांचा तपशील असून त्यात शेकडो लिंक्स आणि स्क्रीनशॉट समाविष्ट आहेत. या दस्तऐवजात असा दावा आहे (AI Generated Deepfake Videos) की, युट्यूबवरील अनेक व्हिडिओ त्यांच्या प्रतिमा आणि आवाजाचा फसव्या, दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक पद्धतीने वापर करतात.

त्यांची प्रतिष्ठा धोक्यात

जोडप्याचा दावा आहे की, अशा डीपफेक व्हिडिओंमुळे केवळ त्यांची प्रतिष्ठा धोक्यात येत नाही, तर त्यांच्या गोपनीयतेच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघनही होत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात गुगलला नोटीस बजावली असून लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.

एआय व्हिडिओंमुळे होणारे परिणाम

याआधीही, अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी याच्याशी संबंधित याचिका दाखल केलेल्या आहेत. 10 सप्टेंबर रोजी अभिषेकने स्वतंत्र याचिका दाखल करून न्यायालयाला त्यांच्या प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षण करण्याची विनंती केली होती. त्यानंतर, ऐश्वर्या राय बच्चन यांनीही एआय व्हिडिओंमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य हानिकारक परिणामांपासून त्यांच्या प्रतिमा आणि व्यक्तिरेखेचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. या आधीच्या याचिकांमध्ये विशेषतः अशा बनावट व्हिडिओंवर नियंत्रण ठेवण्याची आणि लैंगिक किंवा बदनामीकारक सामग्रीपासून संरक्षण करण्याची मागणी केली होती, ज्यावर न्यायालयाने दिलासा दिला होता.

follow us