Aishwarya Rai: घर सोडलं, घटस्फोट घेतला… अभिनेत्रीनं अखेर दिला चर्चांना पूर्ण विराम

Aishwarya Rai: घर सोडलं, घटस्फोट घेतला… अभिनेत्रीनं अखेर दिला चर्चांना पूर्ण विराम

Aishwarya Rai Bachchan enjoys Kabaddi Match with Family : बच्चन कुटुंब बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की अभिषेक आणि ऐश्वर्या राय विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवाय ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) आणि श्वेता बच्चन यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या वेगळे राहत असल्याचा दावाही अनेक दिवसांपासून केला जात आहे. अशातच आता ऐश्वर्या सासरे अमिताभ आणि पती अभिषेकसोबत (Abhishek Bachchan) कबड्डीचा सामना बघत असल्याचे दिसत आहे.


ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार असल्याची अनेकदा जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र त्याचवेळी बच्चन कुटुंबीय एकत्र स्पॉट होत या चर्चांना पूर्णविराम देताना दिसत आहेत. यंदाही असचं काहीस घडलं आहे. ऐश्वर्याने नुकतचं लेक आराध्या, पती अभिषेक आणि सासरे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत कबड्डीचा सामना बघताना पाहायला मिळाली आहे.

अभिषेक-ऐश्वर्या एकत्र दिसले

शनिवारी 6 जानेवारी रोजी सरदार वल्लभभाई पटेल मुंबईच्या इनडोअर स्टेडियममध्ये पोहोचले होते. जिथे बच्चन कुटुंब प्रो कबड्डी लीग पाहण्यासाठी एकत्र आले होते. येथे हे तिघेही अभिषेकसोबत स्टँडमध्ये बसले होते आणि त्यांनी जयपूर पिंक पँथर्सची जर्सी घातली होती. जयपूर पिंक पँथर्सचा सामना यू मुंबाशी झाला. जिथे मुंबा यू संघाने सामन्यात 31 गुण मिळवले. तर जयपूर पिंक पँथर्सने 41 गुण मिळवून विजय मिळवला होता. ‘स्टार स्पोर्ट्स’ने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सामन्याच्या दरम्यानचा आहे.

व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे चाहते आनंदाने नाचत आहेत. अमिताभ बच्चन यांनी मुलगा, सून आणि नातवासोबत या सामन्याचा आनंद लुटला. व्हिडिओतील आराध्याचा नवा लूकही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे शेअर करताना, स्टार स्पोर्ट्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मुंबई लेगच्या पहिल्या गेममध्ये जयपूर पिंक पँथर्सचा विजय पाहण्यासाठी अमिताभ, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन फॅमिली उपस्थित होते.

Raid 2: ना खाली हाथ आये थे, ना खाली हात जाएंगे; अजय देवगणच्या ‘रेड 2’ च्या शूटिंगला सुरुवात

अभिषेक बच्चन वर्कफ्रंट: अभिषेक बच्चन आणि बंटी वालिया जयपूर पिंक पँथर्सचे सह-मालक आहेत. 2014 मध्ये या संघाने प्रो कबड्डीमध्ये खेळायला सुरुवात केली. अभिषेक बच्चनच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेता शेवटचा ‘घूमर’ चित्रपटात दिसला होता. येत्या काही दिवसांत अभिषेक बच्चन ‘हेरा फेरी 3’, ‘द बिग बुल 2’ आणि ‘बी हॅप्पी’मध्ये दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज