Raid 2: ना खाली हाथ आये थे, ना खाली हात जाएंगे; अजय देवगणच्या ‘रेड 2’ च्या शूटिंगला सुरुवात

Raid 2: ना खाली हाथ आये थे, ना खाली हात जाएंगे; अजय देवगणच्या ‘रेड 2’ च्या शूटिंगला सुरुवात

Ajay Devgn Raid 2 Shooting Start : बॉलिवूड सिंघम अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgn) सिनेमांची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करत अजयने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. पोस्टर आऊट झाल्याने चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. 2018 च्या या मोठ्या हिट चित्रपटाचा दुसरा भाग ‘रेड 2’ (Raid 2 Movie) ची घोषणा करण्यात आली असून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)


दरम्यान, या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणने चित्रपटाच्या मुहूर्ताचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, ‘रेड 2’चे शूटिंग आजपासून अधिकृतपणे सुरू झाले आहे. या फोटोमध्ये साऊथचा सुपरस्टार रवी तेजा (Ravi Teja) देखील बघायला मिळत आहे.

साऊथचा सुपरस्टार रवितेजाचे आभार मानत अजय देवगणने कॅप्शनमध्ये लिहिले की, “रेड 2 चे शूटिंग आज अधिकृतपणे सुरू झाल्याची माहिती यावेळी सांगितली आहे. सेटवर अप्रतिम ऊर्जा आहे. रवी तेजा, मुहूर्त शॉटमध्ये येऊन त्याचे सौंदर्य वाढवल्याबद्दल धन्यवाद, अशी पोस्ट यावेळी अभिनेत्यांनी लिहिली आहे. पहिल्या फोटोशिवाय या पोस्टमध्ये आणखी दोन फोटो आहेत, ज्यामध्ये शेवटच्या फोटोमध्ये ‘रेड 2’चे पोस्टरही वापरले गेले आहे. शिवाय दुसऱ्या फोटोत भूषण कुमार अजय देवगण, रवी तेजा आणि अभिषेक पाठकसोबत बघायला मिळाले आहेत.

Pravin Tarde : प्रवीण तरडेंच्या ‘लॉकडाऊन लग्न’ चित्रपटाचं धमाकेदार पोस्टर आलं समोर

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? अजय देवगणनेही चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, हा चित्रपट 15 नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार गुप्ता यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच घेतली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज