चित्रपटसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन…

प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आलीयं. काही दिवसांपूर्वीच त्यांना कॅन्सर आजाराने ग्रासले होते.

WhatsApp Image 2024 10 14 At 7.28.30 PM

WhatsApp Image 2024 10 14 At 7.28.30 PM

Atul Parchure News : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कॅन्सर आजाराने ग्रासले होते. त्यानंतर अखेर त्यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आलीयं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.

उद्धव ठाकरेंना पुन्हा ह्रदयविकाराचा त्रास; रिलायन्स रुग्णालयात दाखल

डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्याने कर्करोप बळवला…
मराठी सिनेविश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अतुल परचुरे. बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या या अभिनेत्याने मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. नाटक, सिनेमा, मालिका अशा विविधांगी माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु, मध्यंतरी सारं काही सुरळीत सुरु असताना त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा मधला काळ त्यांच्यासाठी प्रचंड जोखमीचा आणि कठीण होता.डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या सल्ल्यामुळे त्यांचा कर्करोग आणखीनच बळावला असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

विश्रांती घेतलेला पाऊस राज्यातील काही भागांत पुन्हा सक्रिय; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट

गाजलेले नाटके

अतुल परचुरे यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या नाटकांमध्ये तर अळी मिळी गुपचिळी, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे, माझा होशील ना, होणार सून मी ह्या घरची या मालिकांमध्ये अभिनय केलायं. ते मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाने ग्रासले होते, रंगभूमीवर पुन्हा एकदा येणार असल्याचा त्यांनी जाहीर केलं होतं. त्यासाठी सूर्याची पिल्ले नाटकाची निवडही त्यांनी केली, मात्र, प्रकृतीने साथ दिली नाही, अखेर एका हुरहुन्नरी कलाकाराने जगाचा निरोप घेतला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Exit mobile version