विश्रांती घेतलेला पाऊस राज्यातील काही भागांत पुन्हा सक्रिय; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट
Maharashtra Rain Update : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस राज्यातील काही भागांत पुन्हा सक्रिय झाला आहे. (Rain) तर, काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होताना पाहायला मिळत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नैऋत्यमौसमी पावसाने बिहार, झारखंडच्या उर्वरित भागातून तर पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या पूर्व भागातून तर छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागातून माघारी फिरला आहे. तर आसाम, मेघालय व वायव्य बंगालच्या काही भागातून नैऋत्य मौसमी वाऱ्याने माघार घेतलेली आहे. पूर्व मध्य आणि नगरच्या पश्चिम मध्य अरबी समुद्रावर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र याच भागावर स्थिर आहे. आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील NRI कॉम्प्लेक्सच्या १७ व्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाला आग विझविण्यात यश
आज कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरातील हवामानाचा अंदाज अशा प्रकारे आहे पुढील तीन ते चार दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट सहित हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.