आर.के. लक्ष्मण यांची 103 वी जयंती; आयुष्मान खुरानाकडून ट्रिब्यूट, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Actor Ayushmann Khurrana Tribute To R.K. Laxman : प्रसिद्ध चित्रकार आणि व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 103व्या जयंतीनिमित्त बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुरानाने (Actor Ayushmann Khurrana) सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. लक्ष्मण यांच्या कामाने देशातील असंख्य लोकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप सोडली. या यादीमध्ये आयुष्मान खुराना देखील आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आयुष्मान म्हणाला की, […]

आयुष्मान खुराना

आयुष्मान खुराना

Actor Ayushmann Khurrana Tribute To R.K. Laxman : प्रसिद्ध चित्रकार आणि व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 103व्या जयंतीनिमित्त बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुरानाने (Actor Ayushmann Khurrana) सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. लक्ष्मण यांच्या कामाने देशातील असंख्य लोकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप सोडली. या यादीमध्ये आयुष्मान खुराना देखील आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आयुष्मान म्हणाला की, आर.के. लक्ष्मण (R.K. Laxman) यांनी अनेकांच्या जीवनाला स्पर्श केलाय, त्यात मीही आहे”.

आर.के. लक्ष्मण यांना श्रद्धांजली अर्पण करत आयुष्मान म्हणाला की, “आमच्या काळातील खऱ्या आयकॉनला सलाम. आर.के. लक्ष्मण सर! तुम्ही ज्या प्रकारे सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व केलं, ते अतुलनीय (R.K. Laxman birth anniversary) आहे. लाखो भारतीयांना आवाज दिल्याबद्दल धन्यवाद… तुम्ही अनेकांना प्रेरणा दिली आहे, ज्यात मीही आहे.” आर.के. लक्ष्मण यांनी नेहमीच आपल्या कामाद्वारे आवाज नसलेल्या लोकांना आवाज देण्याचे काम केले. त्यांचे ‘कॉमन मॅन’ चे किस्से अत्यंत हास्यात्मक आणि समजूतदार होते, जे सर्व वयोगटातील प्रेक्षकांशी जोडले जातात.

‘सॅटरडे नाईट’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ! अध्यांश मोशन पिक्चर्स घेऊन येत आहे… थरारक चित्रपट

महान व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्याबद्दल बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला की , “आर.के. लक्ष्मण सर हे खरे भारतीय आयकॉन आहेत. त्यांनी आपल्या असामान्य कार्यातून सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यांनी सामान्य माणसाला वेळ, जीवन आणि राजकारणाचे साक्षीदार बनवलं. इतर अनेक भारतीयांसारखं, मी देखील त्यांच्या कामाचा मोठा चाहता आहे. त्यांच्या व्यंगचित्रांनी देशातील लाखो लोकांच्या भावना अचूक पकडल्या.” 1950च्या दशकापासून जवळपास पाच दशकं, श्री लक्ष्मण यांच्या चित्रांमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. ज्यात आयुष्मान खुराना देखील आहे. आयुष्मानच्या चित्रपटांमधील सामान्य माणसाची कथा दाखवणाऱ्या भूमिकांमध्ये लक्ष्मण यांच्या प्रभावाची झलक दिसून येते.

कोट्यावधी रूपयांचं घर, गाड्या अन् सोनं-चांदी; प्रियांका गांधीची एकूण संपत्ती किती? घ्या जाणून

लक्ष्मण यांच्या प्रभावाबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला की, “शाळा आणि कॉलेजपासूनच त्यांच्या कामाचा माझ्यावर प्रभाव पडला. कारण मी नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न मांडणारे नाटक करायला आवडत होते. मी त्यांच्या काही रचना वाचल्या आहेत. त्यांच्या रेखाचित्रांचा अर्थ आणि त्यांच्या मांडणीने नेहमीच प्रभावित झालो आहे. त्यांनी अनेकांचे जीवन स्पर्श केले आहे, ज्यात मीही आहे. माझ्या चित्रपट निवडीत देखील, मी नेहमी भारतातील लोकांचे आणि त्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अद्वितीय सर्जनशीलतेचा मी साक्षीदार असल्याचा मला अभिमान आहे.”

 

Exit mobile version