कसदार अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन

कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्याचा नावलौकिक होता. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसेच इतर भूमिका साकारल्या.

News Photo (22)

News Photo (22)

आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन झालं आहे. हिंदी सिनेसृष्टीत एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्याचा नावलौकिक होता. (Acting) आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसंच इतर भूमिका त्यांनी साकारल्या. यांच्या जाण्याने सिनेजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

असरानी यांचं आज ( दि.२० नोव्हेंबर) रोजी सायंकाळी चार वाजता निधन झालं. दीर्घकाळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शरीराने उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते मूळचे राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी होते. गेल्या अनेक वर्षांपासून असरानी यांची सर्व कामे त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा हेच पाहायचे. त्यांनीच असरानी यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती.

टीव्हीच्या इतिहासातील आयकॉनिक मालिकांचा संगम; स्मृती इराणींनी सांगितली खासियत

असरानी यांना आरोग्य निधी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार होता, असे बाबूभाई थिबा यांनी सांगितले आहे. त्यांनी आपले जयपूरमधील शिक्षण सेंट झेवियर्स येथून घेतले होते. असरानी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांत काम केलं. त्यांनी साकारलेल्या काही विनोदी भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. शोले चित्रपटात त्यांनी साकारेलल्या जेलरच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते.

असरानी यांनी 1967 साली त्यांचा गुजराती भाषेतला एक चित्रपट आला होता. त्यांच्या करिअरमधील हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर हरे कांच की गुडीया हा चित्रपट आला. त्यांनी नमक हराम (1973) या चित्रपटात केलेल्या भूमिकेचे फारच कौतुक झाले. त्यानंतर मात्र त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. पुढे कोशीश (1972), बावर्ची (1972), परिचय (1972), अभिमान (1973), मेहबुबा (1976), पलकोंकी छाव मे (1977), दो लडके दोनो कडके (1979), बंदीश (1980) यासारख्या चित्रपटांत काम केलं.

Exit mobile version